पहलगामनंतर दहशतवाद्यांच्या पापांचा घडा भरला!

भारतीय लष्कराने कारवाईची दिली माहिती

पहलगामनंतर दहशतवाद्यांच्या पापांचा घडा भरला!

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान झालेल्या युद्धबंदीबाबत आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराने सोमवार, १२ मे रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले की, भारताची लढाई दहशतवाद्यांशी आहे आणि पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला हे दुर्दैवी आहे. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला होता. पाकिस्तानने केलेल्या कारवाईमुळे त्याला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले. पाकिस्तानकडून आमच्यावर चिनी क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला पण ते आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेत प्रवेश करू शकले नाहीत. आमच्या संरक्षण यंत्रणेने वाटेतच ही क्षेपणास्त्रे नष्ट केली, अशी माहिती त्यांनी दिली.

ए के भारती पुढे म्हणाले की, भारताची हवाई संरक्षण प्रणाली बहुस्तरीय असून सर्व पाकिस्तानी ड्रोन स्वदेशी काउंटर ड्रोन सिस्टमने पाडण्यात आले. भारताची लढाई ही दहशतवादाविरुद्ध आणि दहशतवाद्यांशी होती म्हणूनच ७ मे रोजी फक्त दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला. परंतु, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले हे दुर्दैवी आहे. या लढ्याला त्यांनी स्वतःचा लढा बनवले. यानंतर भारताने बदला घेतला आणि यात त्यांचे जे काही नुकसान झाले, त्याला ते स्वतः जबाबदार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताची हवाई संरक्षण यंत्रणा भिंतीसारखी उभी होती. स्वदेशी आकाश प्रणाली वापरली गेली. पाकिस्तानचे चिनी बनावटीचे क्षेपणास्त्र पीएल-१५ देखील पाडण्यात आले. पाकिस्तानच्या ड्रोन लेसर गनलाही लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन पाडण्यात आले. एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, “आमचे सर्व लष्करी तळ, आमच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि गरज पडल्यास भविष्यातील कोणत्याही मोहिमा पार पाडण्यासाठी सज्जही आहेत.” ते पुढे म्हणाले की भारत- पाकिस्तान सीमेवरील तणाव हा एक वेगळ्या प्रकारचे युद्ध होते आणि ते होणारच होते. देव न करो, पण जर आपण दुसरे युद्ध लढले तर ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला पुढे राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले

डीजी एनओ व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन. प्रमोद म्हणाले की, पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाने बहुस्तरीय तयारी केली आहे. शेकडो किलोमीटरचे निरीक्षण केले. कोणत्याही संशयास्पद किंवा शत्रूच्या विमानाला काहीशे किलोमीटर जवळ येण्याची संधी देण्यात आली नाही.

हे ही वाचा..

अमेरिका, चीनमधील टॅरिफ वॉर ९० दिवसांसाठी स्थगित

उद्या दहावीचा निकाल! कुठे पाहता येईल निकाल?

या ग्लासमध्ये लपलंय संपूर्ण ब्रह्मांड!

बीएलए म्हणते आम्ही कोणाच्याही हाती बाहुलं नाही!

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत होते. आपल्या सैन्यासोबतच निष्पाप लोकांवरही हल्ले केले गेले. २०२४ मध्ये शिवखोडी मंदिरात जाणारे यात्रेकरू आणि या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममधील निष्पाप पर्यटक यांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांच्या पापांचा घडा भरला होता. भारताने केलेलं हल्ले हे दहशतवाद्यांवर केले शिवाय हे अचूक हल्ले नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून करण्यात आले असल्याने, पूर्ण कल्पना होती की पाकिस्तानचा हल्ला सीमेपलीकडूनही होईल, म्हणून हवाई संरक्षणाची तयारी केली होती. ९- १० मे रोजी जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने आमच्या हवाई क्षेत्रांवर आणि लॉजिस्टिक्स प्रतिष्ठानांवर हल्ला केला तेव्हा या मजबूत हवाई संरक्षण ग्रिडसमोर (पातळी) ते अपयशी ठरले. यासाठी सीमा सुरक्षा दलाचे कौतुक आहे ज्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उध्वस्त झाल्या.

Exit mobile version