महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता संपली आहे. दहावीच्या परीक्षाचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. उद्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी यासंबंधी माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली. १२ वी च्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटला होता. त्यामुळे आता १० वी च्या निकालाकडे विशेष लक्ष असणार आहे.
हे ही वाचा..
या ग्लासमध्ये लपलंय संपूर्ण ब्रह्मांड!
बीएलए म्हणते आम्ही कोणाच्याही हाती बाहुलं नाही!
केस गळण्यामागची काय आहेत कारणे ?
कोणते नियम पाळले तर मिळेल गाढ झोप ?
https://www.mahahsscboard.in, mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहेत. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.
