आवडले म्हणून बापन शेखने बायकोचे नाकच चावून गिळले

पोलिस ठाण्यात दाखल केली तक्रार

आवडले म्हणून बापन शेखने बायकोचे नाकच चावून गिळले

बंगालच्या नदिया जिल्ह्यातील शांतिपूर येथे एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. बापन शेख नावाच्या व्यक्तीने झोपलेल्या अवस्थेत स्वतःच्या पत्नीचे नाक छाटले आणि ते खाल्ले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव मधू खातून असून, तिने पोलिसांना सांगितले की तिचा पती, शांतिपूरच्या बेरपारा भागातील बापन शेख हा नेहमीच तिच्या नाकाचे कौतुक करायचा आणि त्याला ते नाक आवडत होते. २ मे (शुक्रवार) रोजी जेव्हा मधू खातून झोपलेली होती, तेव्हा बापनने अचानक तिच्यावर हल्ला करून तिचे नाक चावले व त्याचे मांस गिळले. मधू खातून तीव्र वेदनेने जागी झाली तेव्हा बापनने तिला पकडून तिच्या हातालाही चावा घेतला.

हे ही वाचा:

पावसाने दिल्लीच्या प्लेऑफच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं!

युद्धाची शक्यता नाकारता येत नाही

स्वतःहून अमेरिका सोडत असाल, तर १,००० डॉलर्स देऊ!

जातीगणनेबाबत खर्गे यांच्याकडून पंतप्रधानांना पत्र

यामुळे संतप्त झालेल्या मधू खातूनने ३ मे (शनिवार) रोजी आपल्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीनुसार, बापन शेख दारुड्या असून वारंवार तिच्यावर अत्याचार करायचा. दोघांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली असून  त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे. बापन नेहमी तिला म्हणायचा की ती खूप सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकीही त्याने दिली होती. रणाघाटचे पोलीस अधीक्षक आशीष मिज्या यांनी सांगितले की, यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून योग्य ती कारवाई सुरू आहे.

Exit mobile version