विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी! पोलिसांकडून तपसणी सुरू

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आलेल्या धमकीमुळे खळबळ

विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी! पोलिसांकडून तपसणी सुरू

मुंबईतील विधान भवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार, १२ मार्च रोजी विधानभवन कार्यालयाच्या ईमेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी तातडीने विधानभवन परिसरात सर्च आपरेशन सुरू केले आहे. सध्या विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलं आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात येत असतात. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना तपासणी होईपर्यंत आत येण्यास मनाई करण्यात आली.

हे ही वाचा:

भारताची रशियन तेल आयात ५०% ने वाढली

फारूक अब्दुल्लांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न

टफ निगोशिएटर, पियूषजी…

होर्मुझ सामुद्रधुनी संकटाच्या पार्श्वभूमीवर IEA चा ऐतिहासिक निर्णय

पोलिसांकडून प्रत्येक केबिनची चेकींग केली जात आहे. कुठे काही संशयास्पद गोष्टी आढळतात का, याची झाडाझडती घेतली जात आहे. त्यासोबत बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच डॉग स्कॉड पथकालाही बोलवण्यात आले आहे. या संपूर्ण परिसराची सध्या तपासणी केली जात आहे. पोलिसांनी हा ईमेल कोठून आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version