29.2 C
Mumbai
Sunday, May 3, 2026
घरविशेषट्रान्सपॉन्डर, स्वयंचलित प्रणाली बंद... होर्मुझ सामुद्रधुनी पार करत तेलवाहू जहाज मुंबईत!

ट्रान्सपॉन्डर, स्वयंचलित प्रणाली बंद… होर्मुझ सामुद्रधुनी पार करत तेलवाहू जहाज मुंबईत!

होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे भारताकडे आलेले पहिले जहाज

Google News Follow

Related

भारतीयाच्या नेतृत्वाखालील लायबेरियाचा ध्वज असलेल्या जहाजाने दोन दिवसांपूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आणि मुंबई गाठली आहे. सौदी अरेबियातील कच्च्या तेलाची वाहतूक करणारे हे जहाज आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून या भागातील सागरी वाहतूक जवळजवळ थांबली आहे. या जलमार्गावरून सुरक्षितपणे प्रवास करणारे हे भारताचे पहिले जहाज ठरले आहे.

लायबेरियाचा ध्वज असलेल्या ‘शेनलॉन्ग सुएझमॅक्स’ने १ मार्च रोजी सौदी बंदर रास तनुरा येथून कच्चे तेल भरले आणि दोन दिवसांनी ते आपल्या प्रवासाला निघाले. सागरी डेटा फर्म्स लायड्स लिस्ट इंटेलिजेंस आणि टँकरट्रॅकर्सच्या मते, ८ मार्च रोजी जहाज होमुर्झ सामुद्रधुनीच्या आत होते. इराणने व्यापारी जहाजांवर हल्ला केला आहे आणि चीनकडे जाणाऱ्या जहाजांव्यतिरिक्त इतर जलवाहिनींमधून तेल जाऊ न देण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे जगातील सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक मार्ग अशक्य झाला आहे. त्यानंतर मुंबईकडे जाणारे हे जहाज रेकॉर्डवरून गायब झाले होते. याचा निष्कर्ष असा काढण्यात आला की, धोकादायक मार्गावर प्रवास करताना दिसून येऊ नये म्हणून जहाजाने आपले ट्रान्सपॉन्डर आणि स्वयंचलित ओळख प्रणाली बंद केली होती. यानंतर ९ मार्च रोजी ट्रॅकिंग डेटाबेसमध्ये जहाज पुन्हा दिसले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जहाज बुधवारी दुपारी १ वाजता ते मुंबई बंदरात पोहोचले. “शेनलॉन्ग जहाज १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल वाहून नेत आहे. ते जवाहर द्वीप येथे थांबले आहे आणि त्यांनी माल उतरवण्यास सुरू केले आहे,” असे मुंबई बंदर प्राधिकरणाचे (एमबीपीए) उपसंरक्षक प्रवीण सिंग यांनी सांगितले. कच्चे तेल पूर्व मुंबईतील माहुल येथील रिफायनरीजमध्ये जाईल. या जहाजावर २९ भारतीय, पाकिस्तानी आणि फिलिपिनो कर्मचारी आहेत, तर जहाजाचा कॅप्टन सुखशांत सिंग संधू आहे. जहाजाला माल उतरवण्यासाठी सुमारे ३६ तास लागतील, असे मुंबईतील शेनलॉन्ग हाताळणाऱ्या अटलांटिक ग्लोबल शिपिंगमध्ये काम करणारे जितेंद्र जाधव म्हणाले.

हे ही वाचा:

विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी! पोलिसांकडून तपसणी सुरू

IT क्षेत्रात ‘मूनलायटिंग’चा वाढता ट्रेंड

इराकमधील टँकर हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

भारताची रशियन तेल आयात ५०% ने वाढली

भारताच्या कच्च्या तेल आणि वायूच्या पुरवठ्यापैकी निम्म्याहून अधिक पुरवठा याच सामुद्रधुनीतून जातो, त्यामुळे टँकर सुरक्षित मार्गामुळे आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील ऊर्जेच्या कमतरतेबद्दलच्या वाढत्या चिंता कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, भारताच्या शिपिंग महासंचालनालयाच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून २८ भारतीय ध्वजधारी जहाजे अजूनही जलमार्गात किंवा त्या जवळच्या परिसरात आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा