मुंबईच्या समुद्रात अजूनही पावसामुळे बोटी पाण्यात उतरविण्यास मनाई आहे. मुंबईच्या समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असून तिथे जाणे धोक्याचे आहे, असे सांगण्यात आले आहे. तरीही काही जण या नियमांचा भंग करून समुद्रात उतरतात. अशीच एक बोट वर्सोव्याच्या समुद्रात उतरविण्यात आली. त्यातील दोन जण बुडून मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे.
पोलिस प्रशासनाने यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाची दखल काही लोक घेत नाहीत. या बोटीत तीन जण प्रवास करत होते. त्यातील एकाने बोट बुडाल्यावर किनारा गाठला पण दोन जण बुडून मृत्युमुखी पडले. किनाऱ्यावर पोहोचलेल्या मच्छिमाराचे नाव विजय बामनिया (३५) असल्याचे कळते.
हे ही वाचा:
नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप
लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल
‘अमृत भारत स्टेशन योजनेतून’ नवा अध्याय !
रात्रीचे साडेनऊ वाजलेले असताना ही घटना घडली. त्यावेळी हे तिघेजण बोट घेऊन वर्सोव्याच्या समुद्रात उतरले होते. त्यावेळी ही बोट बुड़ाली. या घटनेत जे दोघे बुडाले त्यांचा शोध घेण्य़ासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. मात्र रात्रीच्या अंधारात हे शोधकार्य यशस्वीपणे राबवता आले नाही. बुडालेल्या दोघांची नावे उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल अशी होती. यासंदर्भात लाइफ गार्ड, मुंबई महानगरपालिका आणि तटरक्षक दलाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
