उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या मौलाना शमसुल हुदा खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. फसवणूक आणि परकीय चलन कायद्यांतर्गत ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दिलेल्या सविस्तर तपास अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये मौलानांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या आहेत.
मौलाना शमसुल हुदा खान याला २०१३ मध्ये ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. दरम्यान, मौलाना शमसुल हुदा खान हा भारतात इस्लामिक कट्टरवादाला चालना देण्याचा प्रयत्न करत होता. यासंबंधीची माहिती उत्तर प्रदेश एटीएसच्या तपास अहवालात उघड झाली आहे. या मौलवीवर मदरशांसाठी परदेशातून निधी दलाली करण्याचा आणि परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
नक्षलवाद संपला, बिहारच्या चोरमाराचे गावकरी करणार मतदान!
“मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी भारताला दिली नाही तर…” बीसीसीआयने काय दिला इशारा?
अनिल अंबानींच्या ३००० कोटींच्या मालमत्ता गोठवल्या
“चीन तैवान कारवाई करणार नाही!” ट्रम्प यांचा दावा
संबंधित घटनेनंतर, आझमगड आणि संत कबीर नगर येथील त्याच्या दोन्ही मदरशांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. त्याच्या एनजीओ, रझा फाउंडेशनची नोंदणी देखील रद्द करण्यात आली. तपासात असेही उघड झाले की, शमसुल हुदा खान हा इस्लामचा प्रसार करण्याच्या नावाखाली नियमितपणे पाकिस्तानला जात आहे. तसेच पाकिस्तानमध्ये जाऊन तो तेथील अनेक कट्टरपंथी धर्मगुरू आणि संशयितांच्या संपर्कात आहे. शिवाय, त्याचे जम्मू आणि काश्मीरमधील अनेक संशयितांच्या नेटवर्कशी संबंध आहेत. या बाबी तपासात उघड होताच ही कारवाई करण्यात आली आहे.
