दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील चार मुख्य आरोपींची एनआयए कोठडी आणखी १० दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. शनिवारी न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर एनआयए पथक आरोपींना पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन तपास सुरू केला. आता तपास यंत्रणा आतंकी मॉड्यूलची फंडिंग, प्लॅनिंग आणि विदेशी कनेक्शन याबाबत चौकशी अधिक तीव्र करणार आहे. न्यायालयाने डॉ. मुजम्मिल गनी, आदिल राथर, शाहिना सईद आणि मौलवी इरफान अहमद वागे यांना यापूर्वीही १० दिवसांच्या एनआयए रिमांडवर पाठवले होते.
यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले होते. या दिवशी डॉ. मुजम्मिल, डॉ. शाहिना सईद, मुफ्ती इरफान अहमद आणि आदिल अहमद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पटियाला हाउस कोर्टात त्यांना प्रस्तुत करून एनआयए कस्टडी देण्यात आली. एनआयएने न्यायालयाकडे १५ दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती, जेणेकरून पूर्ण मॉड्यूलचे धागेदोरे शोधता येतील. मात्र, न्यायालयाने १० दिवसांची कोठडी मंजूर केली होती. एनआयएच्या म्हणण्यानुसार, या आरोपींनी स्फोटाच्या कटात आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा..
ईसीआय नेट डिजिटल प्लॅटफॉर्म होणार सक्षम
अरविंद केजरीवाल यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत दिल्लीतील बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश
भारत-इस्रायल व्यापार चर्चेतून काय लाभ होतोय ?
दिल्ली स्फोट: पाकिस्तान, बांगलादेशमधून पदवी मिळवलेल्या डॉक्टरांची मागवली माहिती
लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या या भीषण स्फोटात काही निरपराध जणांचा बळी गेला होता, तर अनेक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात एनआयएने यापूर्वीच दोन आरोपींची अटक केली आहे. आमिर राशिद अली, ज्याच्या नावावर स्फोटात वापरलेली कार नोंदणीकृत होती आणि जासिर बिलाल वानी उर्फ दानिश ज्याने दहशतवाद्यांना तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप आहे. या दोघांकडूनही चौकशी सुरू आहे.
या हल्ल्याची तपासणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला सोपविली असून, त्यानंतर एनआयए विविध राज्यांच्या पोलिसांसह मॉड्यूलमधील प्रत्येक घटकाचा शोध घेत आहे. एनआयएचे म्हणणे आहे की, या भीषण दहशतवादी कटाचे सर्व स्तर उघड करण्यासाठी आणि मास्टरमाइंडपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू आहे.
