निरनिराळ्या धार्मिक गटांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल आणि बेकायदेशीर परदेशी निधी मिळवल्याबद्दल उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका व्यक्तीला अटक केली. ग्रेटर नोएडा येथून ही अटक करण्यात आली असून एटीएसला कसना येथील एका कंपनीची माहिती मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फरहान नबी कद्दीकी अशी अटक झालेल्या व्यक्तीची ओळख आहे.
फरहान नबी कद्दीकी हा मेसर्स इस्तंबूल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचा सह-संचालक आहे. त्याला ग्रेटर नोएडाच्या कसना भागातून ताब्यात घेण्यात आले. एटीएसच्या म्हणण्यानुसार, कद्दीकी आणि त्याचे सहकारी हकीकत वक्फी फाउंडेशन आणि रिअल ग्लोबल एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडसह अनेक संस्था चालवत होते. या संस्थांचा वापर हिंदी, उर्दू, अरबी आणि बंगाली भाषांमधील पुस्तके प्रकाशित आणि प्रसारित करण्यासाठी केला जात होता. ज्यांचा उद्देश सामाजिक गटांमध्ये द्वेष आणि विभाजन निर्माण करणे होता.
अधिकाऱ्यांना असे आढळून आले की परदेशातून त्याच्या कंपनीला हवाला आणि इतर बेकायदेशीर मार्गांनी निधी पाठवला जात होता. तपासकर्त्यांचा अंदाज आहे की, या मार्गांनी सुमारे ११ कोटी रुपये हलविण्यात आले होते आणि वेगवेगळ्या भागात मदरसे आणि मशिदी उभारण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले होते. एटीएसला असेही आढळून आले की काद्दिकीने वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांना आश्रय दिला होता.
हे ही वाचा:
कर्नाटकातील तुरुंगात कैद्यांचे नाचगाणे; तुरुंग अधिकाऱ्याची बदली
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना डच्चू देत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!
उत्तर प्रदेशमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य!
गुजरातनंतर फरिदाबादेत ३०० किलो आरडीएक्ससह डॉक्टर सापडला
वेगवेगळ्या एजन्सींमध्ये अनेक आठवडे चाललेल्या देखरेखी आणि माहितीच्या देवाणघेवाणीनंतर ही कारवाई करण्यात आली. कद्दिकीच्या कारवाया प्रकाशन संस्था आणि ऑनलाइन गटांद्वारे काम करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचे आढळून आले. एटीएसने त्यांच्या लखनऊ कार्यालयात कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे आणि या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
