कोलकात्यामध्ये एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये हिंदू फूड व्लॉगरला गोमांस खायला दिल्याचा धक्कादायाक्ल प्रकार उघडकीस आला आहे. यावरून खळबळ उडाली आहे. कोलकात्याच्या पार्क स्ट्रीट परिसरातील एका उच्चभ्रू रेस्टॉरंट- ओलीपबमध्ये एका मुस्लिम वेटरने सय्यक चक्रवर्ती नावाच्या हिंदू फूड व्लॉगरला आणि त्याच्या मित्रांना गोमांस वाढले.
फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये फूड व्लॉगरने सांगितले की, “सध्या, आम्ही पार्क स्ट्रीटमधील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आहोत, जिथे आम्ही मटण स्टेक ऑर्डर केला. त्यांनी आम्हाला बीफ स्टेक वाढला. आम्हाला ते काय आहे हे माहित नव्हते. आम्हाला वाटले की ते मटण स्टेक आहे. आम्ही ते खाल्ले.” तुम्हाला माहित आहे का मी ब्राह्मण आहे? असे संतापलेल्या सय्यक चक्रवर्ती यांनी म्हटले. त्यानंतर अभिनेत्याने आरोपी वेटरच्या धर्माबद्दल विचारपूस केली. “तुमचा धर्म कोणता? तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम? मुस्लिम. मी आता तुम्हाला पोर्क वाढले तर तुम्ही खाल का? तुम्ही आम्हाला आमची गौमाता खायला दिली,” असे ते म्हणाले. जर एखाद्या मुलिमला पोर्क दिले गेले असते तर कोलकात्याची संपूर्ण मुझी टोळी “इस्लामोफोबिया” आणि “अल्पसंख्याक धोक्यात आहेत” असे ओरडली असती. तसेच वेटरला शिक्षा देण्याची मागणी केली असती.
हे ही वाचा:
दिल्ली स्फोटप्रकरणातून नवी माहिती, यहुदी कॉफी चेनला करायचे होते लक्ष्य
चांदीच्या किंमती एका दिवसात १ लाखांनी घसरल्या! सोन्याची काय परिस्थिती?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? काय म्हणाले शरद पवार?
भारताला तेल खरेदीसाठी व्हेनेझुएलाची दारे पुन्हा खुली!
सय्यक चक्रवर्ती आणि त्यांच्या मित्रांनी वेटरला याचा जाब विचारला असता मुस्लिम वेटरने माफी मागितली. दरम्यान, संतप्त सय्यक चक्रवर्ती यांनी विचारले की, “हा विनोद आहे का?” दरम्यान, त्या उच्चभ्रू रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला विचारपूस केल्यानंतर तो हसताना दिसला. “ही हसण्यासारखी गोष्ट नाही,” असे सय्यक चक्रवर्ती आणि त्यांच्या मित्रांनी सांगितले.
