ऑनलाइन गेम खेळताना अल्पवयीन मुलीकडून नग्न फोटो मागितल्याच्या गंभीर प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने एका आरोपीला अटक केली आहे. अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुलीशी संबंधित हा प्रकार उघडकीस आला असून सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १३ वर्षीय मुलगी ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी संवाद साधला. सुरुवातीला सामान्य गप्पा मारल्यानंतर आरोपीने अश्लील बोलणे सुरू करत मुलीकडे नग्न फोटो पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
“उद्धव ठाकरे यांच्याशी लपून छपून भेट करण्याची आवश्यकता नाही…”
टीसीएस प्रकरण बनावट असल्याचा डाव्यांचा अजब सत्यशोध
“उद्धव ठाकरे यांच्याशी लपून छपून भेट करण्याची आवश्यकता नाही…”
अरविंद केजरीवालांच्या भ्रष्टाचार, गुंडागर्दी आणि खोटेपणामुळे पक्ष सोडला
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र सायबर सेल ने तात्काळ कारवाई करत तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून त्याने इतर मुलांनाही लक्ष्य केले आहे का, याचाही तपास केला जात आहे.
सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर तातडीने पावले उचलण्यात आली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ही घटना प्रथम गेल्या वर्षी सायबर जनजागृती कार्यक्रमात अक्षय कुमार यांनी उघड केली होती. त्यांनी सांगितले की, मुलीने प्रसंगावधान राखत लगेच गेममधून बाहेर पडून कुटुंबीयांना माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर सायबर सेलने पालकांना आवाहन केले आहे की, मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद संदेश किंवा वर्तन आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
