31 C
Mumbai
Sunday, April 26, 2026
घरक्राईमनामा२७ वर्षांनंतर गुंडाच्या पुतण्याने ‘खबऱ्या’चा काटा काढला

२७ वर्षांनंतर गुंडाच्या पुतण्याने ‘खबऱ्या’चा काटा काढला

मुंबई क्राईम ब्रँचची ४ दिवसांत कारवाई

Google News Follow

Related

तब्बल २७ वर्षांपूर्वी झालेल्या गँगस्टर सादिक कालिया याच्या एन्काऊंटरचा सूड उगवण्यासाठी त्यांच्या पुतण्यानेच कथित ‘खबऱ्या’चा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नागपाडा परिसरात ७८ वर्षीय इक्बाल इब्राहिम सेलिया यांची त्यांच्या घरी घुसून चॉपरने २० हून अधिक वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने अवघ्या चार दिवसांत आरोपींना नागपूरमधून अटक केली आहे.

हे ही वाचा:

टीसीएस प्रकरण बनावट असल्याचा डाव्यांचा अजब सत्यशोध

अल्पवयीन मुलीची बदनामी; गुजरातमधून एकीला अटक

दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम डोला तुर्कीत अटक

इस्तांबुलमधून दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोला अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिलच्या सायंकाळी सेलिया घरी एकटे असताना सादिक जावर (२९) आणि त्याचा साथीदार नौशाद मिथानी (२२) यांनी घरात प्रवेश केला. दोघांनी मिळून सेलिया यांच्यावर सपासप वार करत त्यांचा खून केला. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. काही वेळाने घरी परतलेल्या कुटुंबीयांना सेलिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. खून केल्यानंतर आरोपी अँटॉप हिल, विद्याविहार मार्गे कल्याणला गेले आणि तेथून वाहनाने थेट नागपूरकडे पळ काढल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने क्राईम ब्रँचने त्यांना नागपूरमध्ये गाठून अटक केली.

सदर प्रकरणाचा धागा १९९९ सालातील एन्काऊंटरशी जोडला जात आहे. गँगस्टर सादिक कालिया यांचा दया नायक यांच्या पथकाने दादरमध्ये एन्काऊंटर केला होता. त्या वेळी जावर केवळ दोन वर्षांचा होता. मात्र, पुढे मोठा झाल्यावर त्याने सेलिया हेच त्या एन्काऊंटरमागील ‘खबऱ्या’ असल्याचा समज करून घेत सूड उगवण्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींना मुंबईत आणून न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा