एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अभ्यासाचा ताण आल्यामुळे उचलले पाऊल

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईतील सर जे.जे.रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकिस आली
आहे. कुटूंबातील आर्थिक अडचण आणि अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जे.जे.मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

रोहन रामफेर प्रजापती (२२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.रोहन हा सर.जेजेच्या ग्रँट मेडिकल कॉलेज येथे एम बी बी एस तृतीय वर्षांमध्ये शिक्षण घेत होता.
महाविद्यालयातील अपना बॉईज हॉस्टेल पाचवा मजला रुम नंबर १९८ राहणारा रोहन याने हॉस्टेलच्या खोलीत रविवारी रात्री गळफास लावलेल्या अवस्थेत रूम पार्टनर रितेश याला आढळून आला.

त्याने याबाबतची माहिती हॉस्टेल व्यवस्थापनाला दिली. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी रोहनचा मृतदेह खाली उतरवून रुगणालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती जेजे मार्ग पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन याने आर्थिक अडचण आणि अभ्यासाच्या तणावातून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

Exit mobile version