बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांना विशेषतः हिंदूंना वारंवार लक्ष्य केले जात आगे. हिंदुंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कट्टरपंथीयांकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. अशातच सिल्हेट जिल्ह्यात, एका हिंदू शिक्षकाला लक्ष्य करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बिरेंद्र कुमार डेके यांच्या घराला आग लावण्यात आली. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबाला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना सिल्हेट जिल्ह्यातील गोवाईघाट उपजिल्ह्यातील नंदीरगाव युनियनमधील बहोर गावात घडली. इस्लामी गटाने शाळेतील शिक्षक बिरेंद्र कुमार डेके यांच्या घराला आग लावल्याचा आरोप आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुटुंबातील सदस्य जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबात आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरली आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला, फेनी जिल्ह्यातील दागनभुईयान उपजिल्ह्यात एका हिंदू पुरूषाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सोमवारी बांगलादेशातील जगतपूर गावातील एका शेतातून २७ वर्षीय ऑटो- रिक्षा चालक समीर दासचा मृतदेह आढळून आला होता. कुटुंबातील सदस्य आणि पोलिसांचा हवाला देत बांगलादेशी वृत्तपत्र दैनिक मनोबकांठाने वृत्त दिले की समीर रविवारी संध्याकाळी त्याच्या ऑटोरिक्षातून निघून गेला. रात्री उशिरा तो घरी परतला नाही तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध सुरू केला. नंतर, त्याचा मृतदेह सदर युनियनमधील जगतपूर गावातील एका शेतात आढळला.
हे ही वाचा:
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव
ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग, भाजप महायुती बहुमताकडे
मेहुल चोक्सीचा मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये सक्रिय!
गेल्या २४ दिवसांत हिंदूंवर हल्ल्याची ही नववी घटना होती. बांगलादेशात हिंदू समुदायांना लक्ष्य करून हिंसाचार सुरू आहे. परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढत आहे. ९ जानेवारी रोजी, भारत सरकारने बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्यांना एक त्रासदायक प्रकार म्हटले. भारताने सांगितले की ते शेजारील देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अशा सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांना कठोरपणे सामोरे जावे लागेल अशी आशा आहे.
