आठ पुरुषांशी लग्न करून धमक्या आणि खोट्या तक्रारी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. समीरा फातिमा असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की आरोपी समीरा ही विवाहित पुरुषांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असे. ती घटस्फोटित असल्याचा दावा करत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि त्यांच्याशी लग्न करत असे. लग्नानंतर ती पुरुषांना कायदेशीर कारवाईची धमकी देवून पैशाची मागणी करत असे.
मार्च २०२३ मध्ये गुलाम पठाण यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, समीराने २०१० पासून अनेक पुरुषांशी लग्न केले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. त्याने सांगितले की तिने त्याला आणि इतरांची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केली.
हे ही वाचा :
६५.५ कोटी रुपयांच्या नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्यात ७,००० पानांचे आरोपपत्र सादर!
जेलमध्ये इतकी छळवणूक झाली की शब्दच अपुरे पडतील
कबुतरांना खाद्य घालणे महागात पडले: मुंबईतील माहीम मध्ये पहिला गुन्हा दाखल!
