नावाचा अजब गोंधळ; मारहाणीतील आरोपीला जामीन, पण सोडले बलात्काराच्या आरोपीला!

हरियाणाच्या फरीदाबादमधील घटना, आरोपीचा शोध सुरु

नावाचा अजब गोंधळ; मारहाणीतील आरोपीला जामीन, पण सोडले बलात्काराच्या आरोपीला!

हरियाणातील फरीदाबाद येथील तुरुंग प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. नीमका तुरुंगातील दोन कैद्यांची नावे आणि त्यांच्या वडिलांची नावे सारखीच असल्याने मारहाण करणारा आरोपी तुरुंगात राहिला आणि नऊ वर्षाच्या मुलावर वारंवार बलात्कार करणारा आरोपी सोडला गेला. या निष्काळजीपणामुळे पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

२७ वर्षीय नितेश पांडे याला ऑक्टोबर २०२१ मध्ये फरिदाबादमध्ये नऊ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याच्या वडिलांचे नाव रवींद्र असे आहे. दुसरा २४ वर्षीय नितेश, ज्याच्या वडिलांचे नाव देखील रवींद्र आहे, त्याला घरात घुसखोरी आणि मारहाणीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.

सोमवारी (२६ मे) फरीदाबाद न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २४ वर्षीय नितेशला जामीन मंजूर केला, ज्याच्यावर मारहाणीचा आरोप आहे. परंतु मंगळवारी, बलात्काराचा आरोप असलेल्या नितेश पांडेला सोडण्यात आले. हे दोघेही एकाच तुरुंगात असल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला असावा.
सदर पोलिस स्टेशनचे प्रभारी उमेश कुमार यांनी आश्वासन दिले की बलात्कार आरोपी नितेशचा शोध सुरू आहे आणि तो लवकरच पकडला जाईल. दोन्ही आरोपींचे नाव नितेश आहे, पण त्यापैकी एकाचा आरोपीने आपले आडनाव लिहिले होते. त्यामुळे मारहाणीचा आरोपी नितेशऐवजी, बलात्काराचा आरोपी नितेश पांडेला सोडण्यात आले. दरम्यान, फरार आरोपी नितेश पांडेने सुटका होण्यासाठी आपली ओळख लपवली असाही तुरुंग प्रशासनाचा दावा आहे.
हे ही वाचा : 
ओडिशात खिडकीतून आली एकापाठोपाठ एक नोटांची बंडले!
ट्रम्प पुन्हा श्रेय घेण्याच्या नादात, भारत-पाक युद्धबंदीत मध्यस्थीचा केला दावा!
दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी!
पाकिस्तानी गुप्तहेर कासिमनंतर त्याचा भाऊ असीमलाही घेतले ताब्यात!

‘नितेश पांडे याने ओळख लपवून सुटका मिळवल्याबद्दल सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे,’ असे तुरुंग उपअधीक्षक विक्रम सिंग यांनी सांगितले. या प्रकरणी तुरुंग अधीक्षक हरेंद्र सिंह यांच्या चौकशीनंतर पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Exit mobile version