ओडिशामधील भुवनेश्वर शहरात एका अपार्टमेंटमधून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खिडकीतून फेकल्याने प्रचंड खळबळ उडाली, आणि हे प्रकरण लाचखोरीशी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. संबंधित व्यक्तीचे नाव बैकुंठ नाथ सरंगी असून ते ओडिशा राज्य ग्रामीण विकास विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
विचित्र प्रकाराने पोलिसांच्या लक्षात आलं की काहीतरी गंभीर प्रकार घडतो आहे – सरंगी यांनी खिडकीतून रोकड फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ही रोकड स्थानिक साक्षीदारांच्या उपस्थितीत पुन्हा जप्त करण्यात आली.
एकूण २.१ कोटी रुपयांची रोकड जप्त
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (विजिलन्स) सरंगी यांच्या अंगुल, भुवनेश्वर आणि पुरी (पिपिली) येथील सात ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले, आणि एकूण २.१ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली.
जप्त केलेल्या रोकडपैकी १.१ कोटी रुपये अंगुल येथील निवासस्थानातून तर १ कोटी रुपये भुवनेश्वर येथील फ्लॅटमधून जप्त करण्यात आली आहे.
छाप्याच्या ठिकाणांची यादी:
-
करडागडिया, अंगुलमधील दोन मजली निवासस्थान
-
भुवनेश्वरमधील डुमडुमा येथील फ्लॅट
-
पुरीतील दुसरा फ्लॅट
-
अंगुलमधील शिक्षकपाडा येथे नातेवाईकांचे घर
-
अंगुलमधील वडिलोपार्जित घर
-
अंगुलमधील वडिलोपार्जित दोन मजली इमारत
-
कार्यालयीन कक्ष
हे ही वाचा:
‘दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांना मोठी किंमत मोजावीच लागेल’
मुंबईत समीर शेखने केले अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
भारताच्या सिंधू कराराची गाझामधील पाणीसंकटाशी तुलना!
२६ अधिकाऱ्यांची विशेष टीम
या तपासासाठी २६ अधिकाऱ्यांची विशेष टीम तैनात करण्यात आली होती ज्यात:
- ८ उप अधीक्षक (DSP)
-
१२ पोलीस निरीक्षक (Inspector)
-
६ सहाय्यक उपनिरीक्षक (ASI)
-
आणि अन्य सहाय्यक कर्मचारी
नोटांची मोजणी सुरूच
व्हिडीओंमध्ये दिसत आहे की अधिकारी रोख रकमेचे बंडल मोजत आहेत, बहुतेक बंडल ५०० रुपयांचे आहेत, काही बंडल २००, १०० व ५० रुपयांचेही आहेत. मोजणी अद्याप सुरू आहे.
अवैध संपत्तीचा आरोप
सरंगी यांच्या विरोधात आरोप आहे की त्यांनी स्वतःच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवली आहे. याच पार्श्वभूमीवर ही धाड टाकण्यात आली होती.
