परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी वडोदऱ्यातील एका खासगी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात भाषण करताना म्हटले की, “जे देश दहशतवादाला प्रोत्साहन देतात, त्याचे पालनपोषण करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करतात, त्यांना त्याची मोठी किंमत मोजावीच लागेल.”
जयशंकर म्हणाले की, “मुंबईवरील २६/११ च्या भ्याड हल्ल्यानंतर जी कठोर प्रतिक्रिया आवश्यक होती, ती त्या वेळी दिली गेली असती तर योग्य ठरले असते. मात्र आजच्या भारताचे धोरण वेगळे आहे – देशाची भूमिका आता खूपच ठाम आणि मजबूत आहे.”
ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ
जयशंकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ चा संदर्भ देत सांगितले की, हे पाकिस्तानपुरस्कृत पाहलगाम हत्याकांड – ज्यात २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप लोकांचा बळी गेला, यानंतर भारताने दिलेले उत्तर होते.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आज जे देश दहशतवादाचे केंद्र बनले आहेत, ते आता सुरक्षित राहिलेले नाहीत. भारताचा ‘शून्य सहिष्णुता’ दृष्टिकोन आता कृतीतून दिसून येतो आहे.”
“भारत अण्वस्त्र धमक्यांमुळे झुकणार नाही”
“आम्ही कधीही अण्वस्त्र धमक्यांपुढे झुकणार नाही,” असे ठामपणे सांगताना जयशंकर म्हणाले की, “भारताच्या राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असलेल्या सर्व निर्णयांचे आम्ही समर्थन करतो आणि पुढेही करत राहू.” ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानकडून अण्वस्त्र युद्धाची थेट धमकी दिली जात होती, परंतु भारताने स्पष्ट करून टाकले की “अशा धमक्यांनी आपले धोरण बदलले जाणार नाही.”
त्यांनी कोणाचे नाव न घेता, “काही देश स्वतः पाकिस्तानला समर्थन देतात आणि शस्त्रसाठा, ड्रोनसारखे संसाधन पुरवतात,” असे म्हणत तुर्कीवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
हे ही वाचा:
मुंबईत समीर शेखने केले अल्पवयीन मुलीवर बलात्कार
गुजरातची गाडी थांबली; मुंबई इंडियंसचा २० धावांनी विजय!
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
प्रभु श्रीराम यांची नीती नव्या भारताची नीती
“भारताच्या भूमिकेला जागतिक पाठिंबा”
जयशंकर म्हणाले की, “जगातील अनेक देशांनी भारताच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला समर्थन दिले आहे, ही बाब आनंददायी आहे.” ते पुढे म्हणाले, “भारतीय समाजात भावना आणि मूल्यांना महत्त्व आहे. आमच्या संसाधनांची मर्यादा असली, तरी आमचे मन मोठे आहे.”
पंतप्रधान मोदींच्या भूमिकेची पुनरावृत्ती
जयशंकर यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याशी मिळते-जुळते होते. मोदींनी ऑपरेशन सिंदूरनंतर देशाला उद्देशून भाषण करताना स्पष्ट सांगितले होते की, “अण्वस्त्र धमक्या भारत सहन करणार नाही. अण्वस्त्र आडसाव्याखाली चालणाऱ्या दहशतवादी ढांच्यांवर भारत कारवाई करणारच.”
