आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला २० धावांनी पराभूत केले. गुजरातला जिंकण्यासाठी २२९ धावांचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र त्यांना २० ओव्हरमध्ये सहा गड्यांसह २०८ धावा करता आल्या.
गुजरातच्या संघाने सुरूवातीस ३ धावांवर कप्तान शुभमन गिलची विकेट गमावल्यानंतरही चांगला पाठलाग सुरू ठेवला. सलामीवीर साई सुदर्शनने १० चौकार आणि १ षटकार यांसह ८० धावा केल्या, पण त्यांच्या विकेटनंतर गुजरातची नाडी मुंबई इंडियंसकडे वळली. वाशिंग्टन सुंदरने २४ चेंडूत ५८ धावा केल्या. पण इतर फलंदाज त्याला सांगली साथ देऊ शकले नाही.
मुंबई इंडियन्सच्या बाजूने जसप्रीत बुमराहने चार ओव्हरमध्ये फक्त २७ धावा देत एक विकेट घेतली आणि किफायतशीर कामगिरी केली.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा टॉप ऑर्डर फॉर्मात होता; रोहित शर्माने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ८१ धावा केल्या. जॉनी बेयरेस्टोने २२ चेंडूत ४७ धावा, सूर्यकुमार यादवने २० चेंडूत ३३, तिलक वर्माने ११ चेंडूत २५, तर हार्दिक पांड्याने ९ चेंडूत नाबाद २२ धावा कुटून काढल्या.
गुजरातचे गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने चार ओव्हरमध्ये ५३ धावा दिल्या पण दोन विकेट्स घेतले. साई किशोरने चार ओव्हरमध्ये ३२ देत दोन विकेट्स घेतल्या आणि सिराजने चार ओव्हरमध्ये २७ धावा देत एक विकेट्स मिळवली.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १ जून रोजी पंजाब किंग्स विरुद्ध आहे. या सामन्यात जिंकणारा संघ ३ जूनला आरसीबीविरुद्ध फायनल खेळेल. अंतिम सामना अहमदाबाद येथे होणार आहे.
