28.1 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरराजकारणभाजपाची 'नबीन' जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव

भाजपाची ‘नबीन’ जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव

वसुंधरा राजे, स्मृती इराणीही नव्या टीममध्ये

Google News Follow

Related

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या राष्ट्रीय संघटनेत मोठे बदल केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, राम माधव आणि बैजयंत जय पांडा यांच्यासह १३ नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपच्या नव्या टीममध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून वसुंधरा राजे, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, डॉ. भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, एम. नागराजा, तारिक मन्सूर आणि मधुचंद्रा कर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील डॉ. भारती पवार यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने राज्यातील भाजप संघटनेच्या दृष्टीनेही या नियुक्तीकडे लक्ष वेधले आहे.

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आले असून, त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता इराणी यांची नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. नव्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या टीममध्ये विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचा समावेश आहे. बी. एल. संतोष राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पदावर कायम राहणार आहेत. तर शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न सोडवा! राहुल गांधींचे सोरेन यांना पत्र

एल निनोचे महासंकट; जागतिक अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरचा धोका?

जुलैमध्ये बांगलादेशात पाठवलेल्या महिलेला मुंबईत पुन्हा अटक

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनुभवी नेत्यांसोबत विविध राज्यांमध्ये प्रभाव असलेल्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि राज्यनिहाय रणनीतीला धार देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी, तर राजेश मंगल यांची संयुक्त कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संबित पात्रा यांच्याकडे ईशान्य भारताचे समन्वयकपद, तर तरुण चुग यांच्याकडे केंद्रीय कार्यालय प्रभारीपद सोपवण्यात आले आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष

  • वसुंधरा राजे सिंधिया
  • तीरथ सिंह रावत
  • राम माधव
  • वैजयंत जय पांडा
  • डी. पुरंदेश्वरी
  • रेखा दर्मा
  • वर्षाचेन नरेंद्रभाई दोशी
  • डॉ. भारती प्रदीण पदार
  • मनप्रीत सिंह बादल
  • नाम सिंह आर्य
  • प्रो. एम. नामराज
  • प्रो. तारिक मंसूर
  • डॉ. मधुचंद्र कर

राष्ट्रीय महामंत्री

  • बी. पन संतोष

राष्ट्रीय सह महामंत्री

  • शिवप्रकाश
  • सौदान सिंह

राष्ट्रीय महामंत्री

  • विनोद तावडे
  • सुनीम बंसम
  • बिप्लब कुमार देब
  • स्मृति ईरानी
  • डॉ. सतीश मूनिया
  • गजेंद्र पटेल
  • हरीश दुद्विवेदी
  • संजय आदिया
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा