26 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरक्राईमनामासांगलीत जिहादीचा हिंदू दांपत्यावर हातोडा, सुऱ्याने हल्ला, पत्नीचा मृत्यू

सांगलीत जिहादीचा हिंदू दांपत्यावर हातोडा, सुऱ्याने हल्ला, पत्नीचा मृत्यू

महिलेचा जागीच मृत्यू, पुरुषाची अवस्था गंभीर

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे कचरा टाकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये झालेला किरकोळ वाद काही मिनिटांतच हिंसक झाला. या हल्ल्यात ३५ वर्षीय मनीषा मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती ४५ वर्षीय मोहन नागप्पा केसरेकर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फरीद अब्दुल शेख (५२) याला घटनेनंतर अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.

ही घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता कुपवाड येथील चाणक्य चौकाजवळील विघ्नहर्ता कॉलनीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा केसरेकर या आपल्या घराबाहेर लाकडाच्या चुलीवर पाणी गरम करण्याची तयारी करत होत्या. त्याचवेळी त्यांचे शेजारी फरीद शेख याने घराच्या मागील रस्त्यावर कचरा टाकला. मनीषा यांनी कचरा टाकण्यास आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

वाद वाढत असल्याचे पाहून मनीषा यांचे पती मोहन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेखने मोहन यांना थप्पड लगावली. पतीला मारहाण झाल्याने मनीषा यांनी शेखला जाब विचारला. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आणि काही वेळातच वादाचे रूप गंभीर हल्ल्यात झाले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, फरीद शेख आपल्या घरात गेला आणि काही वेळाने हातोडा आणि मटण कापण्याचा सुरा घेऊन बाहेर आला. त्याने प्रथम मोहन यांच्यावर हातोड्याने हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. यानंतर शेखने मनीषा यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या डोक्यावर आणि पोटावर अनेक वार करण्यात आले.

या हल्ल्यात मनीषा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, मोहन यांना गंभीर अवस्थेत मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

एल निनोचे महासंकट; जागतिक अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरचा धोका?

लक्ष्मी मित्तल यांच्या युक्रेनमधील स्टील प्लांटवर रशियाचा हल्ला

जुलैमध्ये बांगलादेशात पाठवलेल्या महिलेला मुंबईत पुन्हा अटक

मोदींच्या यादीतील ही आहे मिसिंग लिंक, जे कवचही आहे, शस्त्रही.

आरोपी सायकलवरून फरार

हल्ल्यानंतर फरीद शेख घटनास्थळावरून सायकलने निघून गेला. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे आणि कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे घटनास्थळी पोहोचले.

स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला वानलेसवाडी परिसरातून अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले असून, त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

केसरेकरांच्या मुलांची आबाळ

मनीषा आणि मोहन केसरेकर हे त्यांच्या दोन मुलांसह विघ्नहर्ता कॉलनीत राहत होते. त्यांच्या मुलीचे शिक्षण अकरावीमध्ये, तर मुलगा सातवीमध्ये शिकत आहे. केसरेकर कुटुंब मूळचे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हेब्बाळ येथील आहे. सुमारे नऊ ते दहा महिन्यांपूर्वी त्यांनी कुपवाड येथे नवीन घर बांधले होते.

मनीषा गृहिणी होत्या, तर मोहन बांधकाम क्षेत्रात गवंडी म्हणून काम करत होते. शेजारी राहणारा फरीद शेख हा फरशी बसवण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कचरा टाकण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की एका कुटुंबातील आईचा जीव गेला आणि तिच्या पतीला रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून, हल्ल्यामागील नेमके कारण, घटनेचा क्रम आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा