30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरराजकारणस्टॅलिन यांचा राहुल गांधींना ठेंगा

स्टॅलिन यांचा राहुल गांधींना ठेंगा

तामिळनाडूच्या हितासाठी विधेयकाला पाठिंबा कायम

Google News Follow

केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाला द्रमुकने दिलेला पाठिंबा मागे घेण्याबाबत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीच्या सदस्यांनी रविवारी दिवसभर भरपूर धावपळ केली. तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे नेते एम.के. स्टॅलिन यांचे मन वळविण्यासाठी ते त्यांच्या घरी दाखल झाले पण स्टॅलिन यांचे मन वळवण्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाला यश आले नाही. रविवारी स्टॅलिन यांची चेन्नईतील निवासस्थानी भेट घेऊन या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम राहताना स्टॅलिन यांनी विधेयकाला विरोध केल्यास तामिळनाडूला राजकीय प्रतिनिधित्वासाठी उपलब्ध असलेली किमान हमीही गमवावी लागू शकते, असा युक्तिवाद केला.

संसदेतील पक्षाच्या संख्याबळाचा वापर करून द्रमुकने पुढील २५ वर्षांसाठी तामिळनाडूच्या राजकीय ताकदीचे संरक्षण मिळवले आहे. प्रस्तावित विधेयक नाकारल्यास दक्षिणेकडील राज्यांसमोरील धोका अधिक वाढेल, असे स्टॅलिन यांनी सांगितले.

दरम्यान, संध्याकाळी शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याबरोबरच त्यांनी या विधेयकाला दिलेल्या पाठिंबा देऊ नये ही विनंती करण्यासाठी राहुल गांधींसह सगळे नेते मुंबईत येणार होते.

हे ही वाचा:

वेगवान गोलंदाज शमी भाजपाच्या वाटेवर

आयएसआय समर्थित खलिस्तान दहशतवादी नेटवर्कला झटका

‘भारताची प्रगती, नारीशक्तीच्या स्वप्नांना नवे बळ’

न्यूझीलंड २४३ धावांच्या आघाडीसह मजबूत स्थितीत

पाठिंब्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही

‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्टॅलिन म्हणाले, “परिसीमन विधेयक पराभूत झाले, तर तामिळनाडूसाठी उपलब्ध असलेली किमान हमीही आपण गमावू, अशी आमची भूमिका आहे. ते पुढे म्हणाले, “परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. यासाठी अन्य कोणताही पर्यायी प्रस्तावही उपलब्ध नाही. मला भेटलेल्या पक्षांकडेही दुसरी कोणतीही योजना नाही. आमच्यासाठी तामिळनाडू सर्वप्रथम आहे.

द्रमुक सुरुवातीपासून ज्या मागण्या करत होता, त्या नव्या परिसीमन विधेयकात समाविष्ट करण्यात आल्याचे आपण या नेत्यांना समजावून सांगितल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले. या मागण्यांचा समावेश झाल्याचे नेत्यांनी मान्य केले; मात्र त्यांनी इतर काही चिंता आणि मुद्देही उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची टीका; तामिळनाडूशी गद्दारी 

स्टॅलिन आपल्या भूमिकेवर ठाम असताना शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रमुक अध्यक्षांवर जोरदार टीका केली. परिसीमन विधेयकाला पाठिंबा देऊन स्टॅलिन यांनी तामिळनाडूशी गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे यांनी स्टॅलिन यांना आपली भूमिका पुन्हा विचारात घेण्याचे आवाहन केले. प्रस्तावित परिसीमन प्रक्रिया ही मतांची चोरी करण्याचा आणि सत्ताधारी भाजपला फायदा होईल अशा पद्धतीने मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा