ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच बिहारच्या भूमीवर आले आणि शुक्रवारी बिक्रमगंज येथे झालेल्या जनसभेत पाकिस्तानला इशारा देत त्यांनी ठामपणे सांगितले की, “प्रभु श्रीरामांची रीती हीच नव्या भारताची नीती बनली आहे।”
मोदी म्हणाले, “प्राण जाय पर वचन न जाई” या रामायणातील वचनाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर मी बिहारच्या भूमीवरून देशाला वचन दिलं होतं आणि आज ऑपरेशन सिंदूरद्वारे ते वचन पूर्ण केल्यानंतरच इथे आलो आहे.”
पंतप्रधानांनी सांगितले, “पहलगाममध्ये निर्दोष नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर मी याच बिहारच्या मातीतून स्पष्टपणे सांगितले होते – दहशतीचे आका जे पाकिस्तानमध्ये सुरक्षित बसले आहेत, त्यांना कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दिली जाईल. आज मी इथे आलोय, कारण मी माझं वचन पूर्ण केलं आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्यांनी पाकिस्तानमध्ये बसून आपल्या बहिणींचं सिंदूर पुसलं, त्यांच्या ठिकाणांचा भारतीय सेनेनं खंडहर केलाय. हेच आहे नवा भारत, आणि ही आहे नव्या भारताची ताकद.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज संपूर्ण जगानं पाहिलं की भारताच्या मुलींच्या मस्तकील सिंदूरात किती शक्ती आहे. जी ठिकाणं पाकिस्ताननं आपले किल्ले समजले होते, ती काही वेळात भारतीय सेनेनं जमिनदोस्त केली. पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर आणि एअरबेसवर अचूक हल्ला करून त्यांना गुडघ्यावर आणलं गेलं.”
मोदी म्हणाले की, “बिहारचे असंख्य तरुण सैन्यात आणि बीएसएफमध्ये देशासाठी झटत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये बीएसएफचं अभूतपूर्व शौर्य आणि पराक्रम जगानं पाहिलं. बीएसएफ म्हणजे सीमेवरची अभेद्य भिंत आहे.”
पंतप्रधानांनी शहीद इम्तियाज यांना आदरांजली वाहिली आणि नमन केलं. ते म्हणाले, “सध्या तर तरकशातून एकच बाण निघालाय. दहशतवादाचा फणा जर पुन्हा वर आला, तर तो बिलातून खेचून काढून चिरडून टाकण्यात येईल.”
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
