पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ३१ मे रोजी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी ११:१५ वाजता ते भोपालमध्ये होणाऱ्या ‘लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासम्मेलनात’ सहभागी होतील.
🔹 विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. तसेच एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.
🔹 अहिल्याबाई होळकर यांना समर्पित टपाल तिकीट व विशेष नाणं
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ३०० रुपयांचे विशेष नाणे आणि स्मारक टपाल तिकीट जाहीर करतील, ज्यावर लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे चित्र असेल.
🔹 देवी अहिल्याबाई राष्ट्रीय पुरस्कार
जनजातीय, पारंपरिक व लोककला क्षेत्रातील योगदानाबद्दल एका महिला कलाकाराला ‘देवी अहिल्याबाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाईल.
🔹 सिंहस्थ महाकुंभ २०२८साठी क्षिप्रा नदी घाट प्रकल्प
पंतप्रधान उज्जैनमध्ये ८६० कोटींच्या क्षिप्रा नदी घाट प्रकल्पाचं भूमिपूजन करतील. यात बॅराज, स्टॉप डॅम, वेंटेड कॉजवे यांसारख्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील.
🔹 दतिया व सतना विमानतळांचे उद्घाटन
विंध्य प्रदेशात उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य सेवा वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी दतिया आणि सतना विमानतळांचे उद्घाटन करतील.
🔹 इंदौर मेट्रोच्या येलो लाइनची सेवा सुरू
मोदी इंदौर मेट्रोच्या येलो लाइनवरील सुपर प्रायोरिटी कॉरिडोरवर प्रवासी सेवांचं उद्घाटन करतील. यामुळे प्रवास सुलभ होईल व प्रदूषण कमी होईल.
🔹 अटल ग्राम सुशासन भवनांसाठी निधी
पंतप्रधान मोदी १,२७१ अटल ग्राम सुशासन भवनांसाठी ४८० कोटी रुपयांची पहिली किस्त वितरित करतील. हे भवन ग्रामपंचायतींना स्थायी प्रशासकीय पायाभूत सुविधा पुरवतील.
