29.9 C
Mumbai
Wednesday, May 20, 2026
घरविशेषमालवणीत अस्लम शेख पुत्राचा हिंदूंना त्रास, कुटुंबाच्या दरवाजासमोर अनधिकृत बांधकाम

मालवणीत अस्लम शेख पुत्राचा हिंदूंना त्रास, कुटुंबाच्या दरवाजासमोर अनधिकृत बांधकाम

महानगरपालिका हातोडा कधी चालवणार, सर्वांचा सवाल

Google News Follow

Related

मालाड मालवणी येथे हिंदू कुटुंबांना सातत्याने त्रास देण्याचे प्रकार वारंवार होत असून हिंदूंनी तिथून पलायन करावे याच उद्देशाने हा त्रास दिला जात असल्याची हिंदू कुटुंबांची भावना आहे. अब्बासिया कंपाऊंड येथे काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी मंत्री अस्लम शेख यांचे चिरंजीव तसेच नगरसेवक हैदर अस्लम शेख यांनी केलेल्या बांधकामामुळे एका हिंदू कुटुंबाचा येण्याजाण्याचा मार्गच बंद करण्याचा प्रयत्न आहे.

पोलिसांनी या परिसराचा पंचनामा केला असून त्यात हे अनधिकृत काम सुरू असल्याचे दिसते आहे. सदर हिंदू कुटुंबातील महिलेनेही या बेकायदेशीर बांधकामाबद्दल व्हीडिओच्या माध्यमातून आपली कैफियत मांडली आहे. या कुटुंबाच्या दरवाजासमोरच हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होतो आहे आणि त्याबद्दल तक्रार न करण्यासाठी दबावही आणला जात आहे.

हे ही वाचा:

सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी केले, तामिळ टायगर प्रभाकरनचे स्मरण

सहाय्यक पालिका आयुक्त की गँगस्टर?

सौदी अरेबियामध्ये ८,००० पाकिस्तानी सैनिक आणि विमाने तैनात

मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रागिणी रमाशंकर चौरसिया यांच्या मालकीच्या रुम नं. ६३ (मिलाप सोसायटी, राठोडी, मालवणी) च्या दक्षिणेकडील भिंतीला लागूनच हे अनधिकृत बांधकाम सुरू होते. पोलिसांच्या तपासातून असे लक्षात आले की, घटनास्थळी बांधकाम करत असलेला इसम शौकत हुसेन आबिद हुसेन सैय्यद याने स्वतः हे बांधकाम करत असल्याची कबुली दिली. या बांधकामाबाबत कोणतीही शासकीय परवानगी नाही, असे सय्यदने म्हटले आहे. ‘घराच्या दरवाज्यासमोर सदर अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून आम्हाला दरवाजा न उघडण्याबाबत काही जणांकडून दबाव टाकला जातोय. याप्रकरणी धमकावण्यात सुद्धा आले आहे. हे बांधकाम करण्यासाठी परवानगी असल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र हे बांधकाम अनधिकृत आहे,’ असे रागिणी चौरसिया यांनी म्हटले आहे.

कोणतीही परवानगी नसताना ६ बाय १२ फूट लांबी-रुंदीचे सिमेंट-विटांचे बांधकाम तब्बल १४ फूट उंचीपर्यंत वाढवण्यात आले आहे. यासाठी ६ लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचे सिद्ध केले. आता चौरसिया कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुंबई महानगरपालिका या १४ फुटी अनधिकृत बांधकामावर तात्काळ हातोडा चालवणार का? याकडे संपूर्ण मालाडकरांचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत बांधकामाविरोधात संताप

मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे रस्त्यावर अवैध छबील (पाणपोई) बनवली जात आहे. हे बांधकाम हिंदू महिला रागिणी चौरसिया यांच्या दारातच तयार केले जातेय. नगरसेवक हैदर अली शेख यांनी या बांधकामाचे उद्घाटन केले होते, असे सांगितले जातेय. म्हणून रस्ता अडवून अशा स्वरूपाचे अवैध बांधकाम करणे चुकीचे आहे. आमचा या गोष्टीस निषेध आहे. आम्ही हे अवैध बांधकाम होऊ देणार नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे मालवणी प्रखंड मंत्री मिथिलेश शंकर सिंग यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा