भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याने पाकिस्तानची चांगलीच गोची झाली असून संताप व्यक्त केला जात आहे. जर पुढे अशीच परिस्थिती राहिली तर पाकिस्तानपुढे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. याच दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे एक विधान समोर आले आहे. ताजिकिस्तानमधील एका परिषदेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानात निर्माण झालेल्या संकटाची तुलना गाझामधील पाणीसंकटाइतकीच भयानक असल्याचे म्हटले आहे. तथापि, यावेळी शाहबाज यांनी अशी धमकीही दिली की पाकिस्तान भारताला लाल रेषा ओलांडू देणार नाही.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलिकडेच ताजिकिस्तान दौरा केला आणि या मुद्द्यावरून ते ताजिकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांसमोर विनवणी करताना दिसून आले. सिंधू नदीच्या पाण्याअभावी पाकिस्तानातील संकटाची तुलना त्यांनी गाझामधील सध्याच्या पाणीसंकटाशी केली. गाझामधील मानवतावादी संकट आणि भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी कराराची स्थिती यांचा संबंध जोडताना शाहबाज म्हणाले, ज्याप्रमाणे गाझामध्ये पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला जात आहे, त्याचप्रमाणे भारतही पाकिस्तानविरुद्ध पाण्याचा वापर धोरणात्मक शस्त्र म्हणून करत आहे.
ते पुढे म्हणाले, “सिंधू पाणी कराराअंतर्गत मिळणारा पाण्याचा प्रवाह थांबवून किंवा नियंत्रित करून भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे आणि पाकिस्तान तो कधीही सहन करणार नाही.” त्यांनी हे देखील स्पष्ट केले की पाकिस्तान सिंधू पाणी कराराच्या कोणत्याही उल्लंघनाशी तडजोड करणार नाही आणि भारताला कराराची “लाल रेषा” ओलांडू देणार नाही.
हे ही वाचा :
हा मार्ग देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेतो…
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नेपाळला सापडला!
या आता गर्ल कॅडेट नाहीत, फक्त कॅडेट आहेत…१७ महिला कॅडेट सेनादलांसाठी सज्ज
जसप्रीत बुमराह इंग्रजांना बॉलिंगचा जलवा दाखवणार!
दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की सिंधू पाणी करार रद्द करून भारताने इस्लामाबादला योग्य ठिकाणी मारहाण केली आहे. आता पाकिस्तान जागतिक नेत्यांसमोर पाण्याची याचना करताना दिसत आहे. जेणेकरून काही देश, त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि भारताला पाणी सोडण्यास सांगतील. परंतु पंतप्रधान शाहबाज शरीफ कदाचित विसरले असतील की भारत हा स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा देश आहे. कोणत्याही देशाची मध्यस्थी खपवून घेणार नाही.
بھارت کا سندھ طاس معاہدے کو یکطرفہ اور غیر قانونی طور پر معطل کرنا انتہائی افسوسناک ہے۔ لاکھوں انسانوں کی زندگیاں سیاسی مفادات کی نظر نہیں کی جا سکتیں، پاکستان اس اقدام کو کسی صورت قبول نہیں کرے گا۔
~ وزیرِاعظم محمد شہباز شریف #PMShehbazInTajikistan 🇵🇰🇹🇯 pic.twitter.com/vyuuSDZDTu
— Shehbaz Digital Media (@ShehbazDigital) May 30, 2025
