जगातील नंबर एक टेस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या ड्यूक बॉल आणि स्विंगिंग हवामानात खेळण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. भारत लवकरच इंग्लंडला भेट देणार असून १३ जूनला वॉर्म-अप सामना आणि २० जूनपासून लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
बुमराहने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकल क्लार्क यांच्या युट्यूब चॅनेल ‘बियांड23 क्रिकेट’वर सांगितले,
“इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच वेगळे आव्हान असते. मला ड्यूक बॉलवर बॉलिंग करायला खूप आवडते.”
त्याने पुढे म्हटले की ड्यूक बॉल सतत बदलत असतो, म्हणून त्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल खात्री नाही, पण हवामान आणि स्विंगिंग परिस्थिती कायम राहते. बॉल मऊ झाला तर इंग्लंडमध्ये बॉलिंग करणे आव्हानात्मक ठरते.
बुमराहची इंग्लंडमध्ये ही तिसरी टेस्ट मालिका आहे. आतापर्यंत ८ सामने खेळून त्याने ३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला क्रिकेट संघात प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि अर्शदीप सिंहसारखे साथीदार आहेत, जे इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांविरुद्ध सामना देऊ शकतील.
“इंग्लंडची खेळण्याची पध्दत वेगळी आहे. जेव्हा फलंदाज आक्रमक खेळतात, तेव्हा आम्हाला अधिक आत्मविश्वास मिळतो आणि कोणताही विकेट घेतला जाऊ शकतो,” बुमराहने सांगितले.
२० जून ते ४ जुलैपर्यंत लीड्स, बर्मिंघम, लॉर्ड्स, मँचेस्टर आणि द ओव्हल येथे ५ कसोटी सामने होणार आहेत. पण बुमराह सर्व सामने खेळेलच असे नाही, कारण त्याच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’बाबत टीमचे प्रमुख निवडकर्ते अजित अगरकर बोलले आहेत.
टेस्ट, वनडे आणि टी२० तीनही फॉर्मॅटमध्ये खेळताना शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे, असं बुमराहने स्पष्ट केलं.
“मी सर्व प्रकार खेळायला तयार आहे, पण शरीराची परिस्थिती पाहून सामन्यांची निवड करतो. मी टार्गेट्स ठरवत नाही, फक्त खेळाचा आनंद घेतो .”
