32 C
Mumbai
Tuesday, June 2, 2026
घरस्पोर्ट्स२०२६ फिफा विश्वचषकाचे प्रसारण हक्क ‘झी एंटरटेनमेंट’कडे

२०२६ फिफा विश्वचषकाचे प्रसारण हक्क ‘झी एंटरटेनमेंट’कडे

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर

Google News Follow

Related

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ‘झी एंटरटेनमेंट’ने सोमवार, १ जून रोजी २०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क मिळवले आहेत. यामुळे भारतात ही स्पर्धा कुठे पाहण्यास उपलब्ध होईल या अनिश्चिततेला आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये ११ जून रोजी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या १० दिवस आधी हा महत्त्वपूर्ण असा करार झाला आहे. फिफा आणि संभाव्य हक्कधारकांमध्ये झालेल्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर, फुटबॉलच्या या भव्य स्पर्धेसाठी प्रसारक नसलेल्या प्रमुख बाजारपेठांपैकी भारत एक होता. या करारामुळे ‘झी एंटरटेनमेंट’ला २०३४ पर्यंतच्या इतर ३८ फिफा स्पर्धांचे हक्कही मिळतात, ज्यामुळे या खेळाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एकातील प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे दीर्घकालीन प्रसारण सुरक्षित झाले आहे.

कराराचा आर्थिक तपशील उघड करण्यात आला नाही. तथापि, रॉयटर्सने यापूर्वी वृत्त दिले होते की, फिफाने सुरुवातीला २०२६ आणि २०३० च्या विश्वचषकांचा समावेश असलेल्या भारत पॅकेजसाठी सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती, जी नंतर कमी करून ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर आणली.

भारतातील प्रमुख क्रीडा प्रसारक जिओस्टार, जो रिलायन्स-डिस्नेचा संयुक्त उपक्रम आहे आणि ज्याने आपली पूर्ववर्ती कंपनी व्हायकॉम१८ च्या माध्यमातून २०२२ फिफा विश्वचषक प्रसारित केला होता. त्यांनी या हक्कांसाठी सुमारे २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिली होती, असे वृत्त आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फिफाने ही बोली फेटाळली. भारतात २०१४ आणि २०१८ फिफा विश्वचषकांचे प्रसारण करणाऱ्या सोनीनेही या हक्कांच्या पॅकेजवर चर्चा केली होती, परंतु अखेरीस कोणतीही बोली सादर केली नाही.

हे ही वाचा:

विधान परिषदेची रणधुमाळी; पुण्यात राष्ट्रवादीत बंड, तर संभाजीनगरमध्ये महायुतीत मतभेद

भारताची ओमानकडे वस्तू निर्यात ५० टक्क्यांनी वाढणार

नीट पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा!

विवाहानंतर जोडप्याचे विमान अपघातग्रस्त, भारतीय वंशाच्या डेव्हचा मृत्यू, पण पत्नी वाचली!

या करारामुळे भारतात स्पर्धेच्या उपलब्धतेबाबत महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे आणि चाहत्यांना पहिला ४८-संघीय फिफा विश्वचषक पाहता येणार हे निश्चित झाले आहे. ही विस्तारित स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल आणि स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आवृत्ती (सिझन) असेल अशी अपेक्षा आहे.

आपल्या क्रीडा सेवा अधिक सशक्त करण्यासाठी, कंपनीने युनाईट८ स्पोर्ट्स १, युनाईट८ स्पोर्ट्स १ एचडी, युनाईट८ स्पोर्ट्स २ आणि युनाईट८ स्पोर्ट्स २ एचडी या चार विशेष क्रीडा वाहिन्या सुरू करण्याची घोषणाही केली. ‘झी एंटरटेनमेंट’ने म्हटले आहे की, पुढील आठ वर्षांत फिफा स्पर्धा भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीच्या अनुषंगाने, देशभरातील क्रीडा चाहत्यांना एक आकर्षक पाहण्याचा अनुभव मिळावा यासाठी हे चॅनल्स सुरू करण्यात आले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा