29.4 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरविशेष‘जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा, सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड’

‘जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा, सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड’

आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांचा नॅशनल कॉन्फरन्सला रामराम

Google News Follow

जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, श्रीनगरचे खासदार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा राजीनामा जाहीर केला आहे. तसेच खासदारकीचाही राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला आहे. बडगाम येथे आयोजित जाहीर सभेत हजारो समर्थकांसमोर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वावर टीका करताना, ‘नॅशनल कॉन्फरन्सने जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा केली असून, सत्तेसाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली आहे,’ असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या घोषणेमुळे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीरच्या जनतेला अनेक महत्त्वाची आश्वासने दिली होती. कलम ३७० आणि ३५ अ अंतर्गत घटनात्मक अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न करणे, आरक्षण धोरणात बदल, बेरोजगारीचा प्रश्न सोडवणे आणि जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणे, अशा मुद्द्यांचा त्यात समावेश होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर पक्षाने या आश्वासनांबाबत अपेक्षित भूमिका घेतली नाही. निवडणुकीत जनतेने दाखवलेल्या विश्वासाला पक्षाने न्याय दिला नसल्याची नाराजी मेहदी यांनी व्यक्त केली. जनतेच्या अपेक्षांपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
हे ही वाचा:
सणासुदीच्या गर्दीत रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम

वकिलांवरील हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

राहुल गांधींची पुन्हा परदेशवारी…आता अमेरिका दौरा

‘जालन्यातील महिलांच्या रोजगारासाठी शंभर वेळा रॅम्प वॉक करेन’

लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रातही मेहदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या घटनात्मक अधिकारांसाठी ठामपणे संघर्ष करणे आवश्यक होते. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सने या मुद्द्यांवर अपेक्षित भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्या राजकीय तत्त्वांशी आणि सद्सद्विवेकबुद्धीशी तडजोड करणे शक्य नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मेहदी यांच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्ससमोरील राजकीय आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत नाराजीच्या चर्चा यापूर्वीही समोर आल्या होत्या. त्यातच श्रीनगरच्या खासदाराने पक्ष सोडल्याने राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मेहदी यांनी भविष्यात स्वतंत्र राजकीय व्यासपीठ उभारण्याचे संकेत दिले असून, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या तरुणांना एकत्र आणणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा