32 C
Mumbai
Monday, June 1, 2026
घरक्राईमनामानीट पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा!

नीट पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा!

बीडमधील अनधिकृत अससेल्या चार मजली बांधकामाचे पाडकाम सुरू

Google News Follow

Related

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील कारवाईला वेग आला असून या प्रकरणात सीबीआयने राज्यातील नाशिक, पुणे, लातूर, बीडमधून अनेकांना अटक केली. अशातच या प्रकरणात पेपरफुटीचा मास्टरमाईंड असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याच्याविरोधात बुलडोझर कारवाई केली जाणार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याशी संबंधित बीड शहरातील शाहू नगर भागात सुरू असलेल्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला आहे.

नगरपालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम ठेकेदाराने स्वतः पाडून घ्यावे याकरिता नोटीस बजावली होती. मात्र, प्रसासनाच्या या नोटीसीचा अल्टिमेटम अखेर संपला आहे, त्यामुळे या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जात आहे.

देशभरातून संताप व्यक्त होत असलेल्या, तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यात सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीचे नाव आले होते. यानंतर सीबीआयने त्याला अटकही केली. तो मूळचा बीडमधील असून त्याचे शहरातील शाहू नगर भागात चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, या बांधकामातील अवैधतेबाबात पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावल्यानंतर हे पाडकाम केले जात आहे.

हे ही वाचा:

विवाहानंतर जोडप्याचे विमान अपघातग्रस्त, भारतीय वंशाच्या डेव्हचा मृत्यू, पण पत्नी वाचली!

पहलगाम हल्ल्याआधीच सक्रिय झाले फोन; पाकिस्तानी बँकेचे कनेक्शन

वैभव सूर्यवंशी ठरला वैभवशाली क्रिकेटपटू, पुरस्कारातून ४५ लाखांची कमाई

विझिंजम बंदराचा विक्रम; १८ महिन्यांत २० लाख TEU माल हाताळला

नीट पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी या दोघांना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या बाबतीत तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आले आहेत. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी क्लासेस घ्यायचा. आधी मोटेगावकर क्लासेसमध्ये देखील “प्लॅटिनम गोल्ड बॅच” चालायची अशी माहिती समोर आली आहे. प्लॅटिनम गोल्ड बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जायचे. दरम्यान, सीबीआयकडून आरोपी कुलकर्णी-मोटेगावकर-शिरुरे नेक्ससबाबत तपास सुरू आहे. नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा