31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेषपुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे परवाने निलंबित

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Google News Follow

पुण्यातील प्रसिद्ध आणि खवय्यांच्या पसंतीची वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंट अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईमुळे चर्चेत आली आहेत. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १३ नोव्हेंबर रोजी एफ.सी. रोडवरील या दोन्ही हॉटेल्सची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये अन्नपदार्थांची साठवणूक आणि स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्या.

वैशाली हॉटेलच्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कच्चा माल ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवले होते. डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ आढळला. धुतलेली भांडी स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आली होती. तसेच उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले जात होते. कच्च्या भाज्या आणि तयार अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक केल्याने अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता. तपासणीत वैशाली हॉटेलला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले.

हे ही वाचा:
सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमानाचे हार्ड लँडिंग

रोहित-विराटचा नबीला कानमंत्र

आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान भिडणार!

स्पेसएक्स अंतराळात उभारणार एआय डेटा सेंटर

दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटमध्येही स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. स्वयंपाकघर उघडे आणि अस्वच्छ होते. परिसरात पाणी साचलेले होते, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नव्हते. कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवण्याच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. अन्नपदार्थांवर आवश्यक लेबलिंग, वापरण्याची अंतिम तारीख तसेच तापमान नियंत्रणाच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. अन्नसुरक्षा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातील कागदपत्रांमध्येही त्रुटी आढळल्या.

विशेष म्हणजे, वैशाली हॉटेलला यापूर्वी जून २०२६ मध्येही तपासणीनंतर सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, पुन्हा गंभीर त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आवश्यक सुधारणा करून लेखी परवानगी मिळेपर्यंत दोन्ही रेस्टॉरंटना अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी करता येणार नाही. या कारवाईमुळे पुण्यातील हॉटेल व्यवसायातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा