31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेषसिडकोच्या बिगर-ईडब्ल्यूएस घरांसाठी २७ नोव्हेंबरला सोडत

सिडकोच्या बिगर-ईडब्ल्यूएस घरांसाठी २७ नोव्हेंबरला सोडत

अर्ज मागे घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत

Google News Follow

सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या प्रधानमंत्री आवास योजना एक अंतर्गत डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेतील बिगर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांची सोडत २७ नोव्हेंबर २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाची सोडत यापूर्वीच पार पडली आहे. तर अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची सोडत न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र, या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सिडकोने सोडतीची तारीख जाहीर केली आहे.

या योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या अर्जदारांना घोषणा प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज मागे घेता येणार आहे किंवा सदनिकेवरील दावा सोडता येणार आहे. यासाठी अर्जदारांना सिडकोच्या संकेतस्थळावरील अर्जदार खात्यातून ऑनलाइन विनंती करावी लागेल. अर्ज मागे घेणाऱ्यांना सोडतीत सहभागी होता येणार नाही.
हे ही वाचा:
इराणमध्ये अडकलेल्या भारतीय खलाशाच्या मायदेशी परतीचा मार्ग मोकळा

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा चौक्यांवर हल्ला

तीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारत दौऱ्यावर

रसगुल्ला समजून स्फोटक तोंडात टाकल्याने तरुणाचा मृत्यू

अर्ज मागे घेणाऱ्या अर्जदारांची बुकिंग रक्कम कोणतीही कपात न करता परत केली जाणार आहे. विनंती सादर केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत ही रक्कम परत मिळेल. मात्र, बँक खात्याचा तपशील अचूक असणे आवश्यक आहे. दहा दिवसांत अर्ज मागे न घेणाऱ्या अर्जदारांचा सोडतीतील सहभाग कायम राहणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा