‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पुरावे मागणाऱ्या काँग्रेसवर चहुबाजूने टीका केली जात आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल बोलताना राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींना जर पुरावे पाहिजे असतील त्यांनी पाकिस्तानात जावे, असे ममता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
“जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर १० दिवसांसाठी पाकिस्तानात जा. त्यांची काय अवस्था आहे ते तुम्हीच पहा. भारतीयांना जे काही करायचे होते ते त्यांनी केले आहे,” असे ममता कुलकर्णी म्हणाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांचे कौतुक केले आणि ते एक चांगले व्यक्ती असल्याचे सांगितले. तसेच अभिनेत्रीने स्पष्ट केले की त्यांना राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही.
‘कल्की धाम मंदिरा’शी संबंधित असलेल्या ममता कुलकर्णी म्हणाल्या, “कल्की ही विष्णूजींचा १० वा अवतार मानली जाते. मला पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे आणि ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मी २५ वर्षे ध्यान आणि तपश्चर्या केली आहे आणि या पुण्यकर्मासाठी माझी निवड झाली आहे. मला सनातन धर्माचा प्रचार करत राहायचे आहे.”
हे ही वाचा :
हा मार्ग देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेतो…
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नेपाळला सापडला!
या आता गर्ल कॅडेट नाहीत, फक्त कॅडेट आहेत…१७ महिला कॅडेट सेनादलांसाठी सज्ज
जसप्रीत बुमराह इंग्रजांना बॉलिंगचा जलवा दाखवणार!
त्या पुढे म्हणाल्या, “अजूनही असे बरेच लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणतात की देव अस्तित्वात नाही आणि जर तो अस्तित्वात असेल तर तो कुठे आहे?. त्या पुढे म्हणाल्या, जगात इतक्या गोष्टी घडत आहेत, मग देव कुठे आहे? असा विचार करणे चुकीचे आहे.”
