28 C
Mumbai
Friday, August 21, 2026
घरक्राईमनामाविमानतळावर सरकारी वाहनचालकाची आत्महत्या

विमानतळावर सरकारी वाहनचालकाची आत्महत्या

किडनीच्या आजाराने होते नैराश्य

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सरकारी वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय प्रमोद जाधव यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. दीर्घकाळापासून असलेल्या किडनीच्या आजारामुळे आपण नैराश्यात असल्याचे नमूद करणारी सुसाईड नोट जाधव यांच्याकडे आढळून आली आहे. आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी या नोटमध्ये पत्नी आणि मुलीला उद्देशून लिहिले होते.

जाधव हे वरळी गाव परिसरात कुटुंबासह राहत होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते स्टेज-२ क्रॉनिक किडनी डिसीजवर उपचार घेत होते. सरकारी अधिकाऱ्यांना विमानतळावर आणणे आणि त्यांना तेथून सोडणे यासाठी चोवीस तास तैनात असलेल्या दोन चालकांपैकी ते एक होते. न्यायाधीश, रजिस्ट्रार तसेच अन्य वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी त्यांची वाहनचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हे ही वाचा:

लखनऊमध्ये कौटुंबिक वादाचा थरारक शेवट

रिलायन्सची ₹२.७३ लाख कोटींची मोठी ऊर्जा योजना

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDAचा कडक बडगा

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, जाधव यांच्या वर्तणुकीत आत्महत्येपूर्वी काही बदल झाला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहे.

जाधव यांच्या पत्नी आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आजारपणामुळे ते काही काळापासून नैराश्यात होते. मात्र, ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतील, अशी कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती. सहार पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा