वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी म्हणून ओळखला जाणारा निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून तो फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथके तर पुणे पोलिसांची तीन पथके राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते. त्याच्या अटकेसाठी लुक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली होती. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात तो अनेकदा सहभागी असायचा.
जेव्हा वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी तिचे माहेरचे लोक कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते तेव्हा निलेशने त्यांना पिस्तुल दाखवून घाबरवले आणि घराबाहेर हाकलून लावले आणि बाळाचा ताबा देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला होता. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्यांनी पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तक्रारीवरून निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते.
हे ही वाचा :
या आता गर्ल कॅडेट नाहीत, फक्त कॅडेट आहेत…१७ महिला कॅडेट सेनादलांसाठी सज्ज
जसप्रीत बुमराह इंग्रजांना बॉलिंगचा जलवा दाखवणार!
पाकचा बब्बर हा हिंदुस्थानचा गब्बर!
प्रभु श्रीराम यांची नीती नव्या भारताची नीती
दरम्यान, आज अखेर त्याला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश अशा राज्यातून तो नेपाळमध्ये पोहोचल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरु असून निलेश चव्हाणच्या चौकशीत आणखी काही नवी माहिती समोर येते का?, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
