त्रिपुरा: बकरी ईदला गायींची कत्तल, चौघांना अटक!

नागरिकांकडून संताप व्यक्त 

त्रिपुरा: बकरी ईदला गायींची कत्तल, चौघांना अटक!

बकरी ईदनिमित्त गोहत्या केल्याच्या आरोपाखाली त्रिपुरामध्ये चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचार टाळण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. दरम्यान, याशिवाय त्रिपुराच्या अनेक भागातून गोहत्येचे वृत्त आले आहे. या घटनेमुळे सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पहिला प्रकार त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथील छानबन भागातील आहे. बकरी ईदनिमित्त सार्वजनिकरित्या गायीची हत्या केल्याबद्दल चौघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, परिसरात पुरेसे सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात, उदयपूरच्या राजनगर भागातील एका अल्पसंख्याक कुटुंबाने सार्वजनिक ठिकाणी गायची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही बातमी मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कायद्यानुसार कारवाई केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आहे. या प्रकरणात अटक केल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे ही वाचा : 

एक भारतीय म्हणून मी पंतप्रधानांच्या पाठीशी

प्रेम कधीच बदलत नाही…

अयोध्येत भाविकांची संख्या वाढली

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा बांधला चंग

दरम्यान, ईद किंवा बकरी ईदच्या निमित्ताने सार्वजनिकरित्या प्राण्यांची कत्तल करण्याच्या अशा घटनांच्या बातम्या यापूर्वीही पाहायला मिळाल्या आहेत. २०१८ मध्ये केरळमधून उघड्यावर गायींची कत्तल केल्याची घटना समोर आली होती.

Exit mobile version