लिफ्टसाठी १८व्या मजल्यावर बनवलेल्या खड्ड्याजवळ शौचास बसला आणि तोल गेला

सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

लिफ्टसाठी १८व्या मजल्यावर बनवलेल्या खड्ड्याजवळ शौचास बसला आणि तोल गेला

वडाळ्यातील एका इमारतीत रविवारी पहाटे ५५ वर्षीय व्यक्तीचा अठराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना  घडली.

मृत व्यक्ती हा बहिणीकडे आला होता व त्याला मध्यरात्री शौचास आल्यामुळे तो लिफ्टसाठी बनवलेल्या खड्ड्याच्या किनाऱ्यावर बसला आणि तोल जाऊन अठराव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रफी अजमद किडवाई मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

प्रकाश नामदेव शिंदे (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत प्रकाश शिंदे याची बहीण ही वडाळा येथील बाळाराम खेडेकर मार्गावर असलेल्या एसआरएच्या मातोश्री सदन या अठरा मजली इमारतीत राहण्यास आहे.

प्रकाश शिंदे हे बहिणीकडे राहण्यास आले होते, या इमारतीची लिफ्टचे काम अपूर्ण आहे. मृत प्रकाश हे बहिणीच्या घराबाहेर गॅलरी मध्ये रात्रीचे झोपत होते.

हे ही वाचा:

‘थोंगची’ची जहाज काय आहे?

गझलांचा शहेजादा, साजातून भावना रचणारा जादूगार…

वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार यांची गळफास घेऊन आत्महत्या

हर्षवर्धन श्रृंगला यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रकाश शिंदे यांना शौचास आल्यामुळे ते अठराव्या मजल्यावर गेले आणि लिफ्टसाठी असलेल्या जागेत शौचास बसले होते, त्यांनी घातलेल्या फुल पॅन्टमुळे उठता आले नाही आणि त्याचा तोल जाऊन ते लिफ्टच्या खड्यातुन अठराव्या मजल्यावरून खाली कोसळून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आर.ए.के. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, मृताची पत्नी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूबाबत कोणताही संशय अथवा तक्रार नातेवाईकांनी व्यक्त केलेली नाही. पुढील तपास सुरु आहे.

Exit mobile version