विक्रोळी वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार शंकर भिकाजी सोळसे (५६) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
शंकर सोळसे हे शस्त्रक्रिया झालेल्या पायामुळे त्रस्त होते अशी माहिती समोर आली आहे.याप्रकरणी पार्कसाईड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
शंकर भिकाजी सोळसे हे कुटूंबासह विक्रोळी पश्चिम येथील वर्षा नगर,शिवराज सोसायटी येथील चाळीत राहण्यास होते. मुंबई पोलिस दलात असणारे शंकर सोळसे हे विक्रोळी वाहतूक विभागात सहाय्यक फौजदार होते. दीड वर्षांपूर्वी सोळसे यांच्या एका पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया केलेला पायाचे दुखणे कमी न होता वाढतच होते.
हे ही वाचा:
गझलांचा शहेजादा, साजातून भावना रचणारा जादूगार…
हर्षवर्धन श्रृंगला यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांनी पाच उपमंत्र्यांची केली नियुक्ती
कलकत्ता बलात्कार प्रकरण : तपासासाठी एसआयटीची स्थापना
सोळसे हे पायाच्या दुखण्याला घेऊन त्रस्त होते.
रविवारी सकाळी ८ वाजता त्यांची पत्नी उठली असता शंकर सोळसे हे घरातील लोखंडी जिन्याला साडीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले, पत्नी रंजना यांनी तात्काळ शेजाऱ्यांना बोलावले आणि पती शंकर यांना राजावाडी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.याप्रकरणी पार्कसाईड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
