दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातून प्रसिद्ध मोहेंजोदारो ‘डान्सिंग गर्ल’ पुतळ्याची प्रतिकृती चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एका प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील अशोका विद्यापीठातील एका ४५ वर्षीय प्राध्यापकावर दिल्लीतील लुटियन्स येथील राष्ट्रीय संग्रहालयातून मोहेंजोदारो ‘डान्सिंग गर्ल’ची प्रतिकृती चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहितीनुसार, ही घटना शनिवारी, २० सप्टेंबर रोजी घडली. आरोपी प्राध्यापक काही विद्यार्थ्यांसह संग्रहालयाला भेट देण्यासाठी आले होते. राष्ट्रीय संग्रहालयातील लिपिक निखिल कुमार यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाचा (SI) दुपारी ४ वाजता फोन आला. गॅलरीमधून ‘डान्सिंग गर्ल’ची मूर्ती चोरीला गेल्याचे एसआयने सांगितले. यानंतर तात्काळ तपासणी करण्यात आली आणि उपस्थितांची झडती घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, एक व्यक्ती प्रतिकृती उचलताना दिसली. सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी संग्रहालयाच्या परिसरात असलेल्या प्राध्यापक व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.
अशोका विद्यापीठाने निवेदनात म्हटले आहे की, ते या प्रकरणाची चौकशी करेल. शनिवारी राष्ट्रीय संग्रहालयात घडलेली घटना लक्षात आणून देण्यात आली असून विद्यापीठ या प्रकरणाची चौकशी करेल, असे त्यांनी म्हटले आहे. तर, स्कॅनिंग दरम्यान, संग्रहालयातून त्यांनी खरेदी केलेल्या दगडांपासून बनवलेल्या काही मूर्ती बॅगेत सापडल्या त्यासोबतचं धातूपासून बनवलेली प्रतिकृतीही सापडली. ही प्रतिकृती विक्रीसाठी नव्हती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!
‘वैभव’शाली फलंदाजी, १० सामन्यांत ४१ षटकारांचा विक्रमी पाऊस
वैद्यकीय शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्याने संपवले जीवन
दिवाळीपूर्वी रेल कर्मचाऱ्यांच्या बोनसला मंजुरी
अधिकाऱ्याने सांगितले की, कलम ३०५ (ई) (राहत्यागृहात किंवा वाहतुकीच्या साधनांमध्ये किंवा प्रार्थनास्थळात चोरी) आणि ३१७ (२) (चोरीची मालमत्ता स्वीकारणे) अंतर्गत कर्तव्यपथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीची अधिक चौकशी करण्यात आली आहे. ‘डान्सिंग गर्ल’ची जुनी कांस्य मूर्ती उत्खननात सापडली असून १०.५ सेमी उंचीची ही मूर्ती आहे. तिच्या हातात अनेक बांगड्या आहेत.
