जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या

डॉक्टरने वसतिगृहात गळफास घेत संपवले आयुष्य

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या

सर जेजे रुग्णालयात येथील रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टरने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून निवासी डॉक्टरांवरील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृत डॉक्टरचे नाव डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे (वय २६) असे असून ते धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दासेमगाव येथील रहिवासी होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जे. जे. रुग्णालयात रेडिओलॉजी विभागात निवासी डॉक्टर म्हणून रुजू झाले होते. ते रुग्णालय परिसरातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक ६०४ मध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोरे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करत होते. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

“शिवाजीही आमचे आणि औरंगजेबही आमचे”

बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली

ग्रेट निकोबार प्रकल्प उघड होतायत चेहऱ्यामागील चेहरे…

विदर्भात उष्णतेचा कहर वाढणार

मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे रेडिओलॉजी विभागात ड्युटीसाठी हजर न झाल्याने सहकारी डॉक्टरांना संशय आला. दुपारच्या सुमारास काही सहकाऱ्यांनी हॉस्टेलमधील त्यांच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. सर, जे.जे मार्ग पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version