सलमान खान आणि वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिष्णोईचा संबंध?

सलमान खान आणि वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिष्णोईचा संबंध?

हिंदी चित्रपट सृष्टीतील दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे लेखक वडील सलीम खान यांना एका चिठ्ठीतून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून धमकी देणारा व्यक्ती कोण आहे व कश्यासाठी धमकी देण्यात आली याबाबत अद्याप काही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सलमान खान हा वांद्रे पश्चिम येथे कुटुंबासह राहण्यास आहे, त्याचे वडील सलीम खान हे चित्रपट लेखक आहे. सलीम खान हे दररोज सकाळी व्यायाम आणि वॉकिंगसाठी वांद्रे बँडस्टँड येथे आपल्या सुरक्षा रक्षकासह जात असतात. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ७ वाजता सलीम खान हे सुरक्षा रक्षकासह वॉकिंग साठी बँड स्टँड या ठिकाणी गेले होते, वॉकिंग झाल्यानंतर नेहमीच्या बाकड्यावर बसण्यासाठी गेले असता त्या बाकड्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकाला एक चिठ्ठी मिळून आली.ती चिठ्ठी त्याने सलीम खान यांच्याकडे दिली, सलीम खान यांनी चिठ्ठी उघडून बघितली असता त्या चिठ्ठीत सलीम खान आणि सलमान यांना उद्देशून ‘सलीम खान सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’ असे लिहून त्या धमकी खाली इंग्रजी मध्ये k.G.B.L.B’ असे लिहले होते.

हे ही वाचा:

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी हटवले

पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”

 

हा काय प्रकार आहे हे सलीम खान यांच्या लक्षात आलं नाही मात्र कोणी तरी धमकी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे लक्षात येताच त्यांनी सुरक्षा रक्षकासह थेट वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.तक्रारीत सलीम खान यांनी मला व माझा मुलगा सलमान खान याला अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.

वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून बँडस्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लॉरेन्स बिष्णोईकडून धमकी

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गुंडाने बॉलिवूडचा दबंग सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. व्हिडिओमध्ये लॉरेन्सने जोधपूरमध्ये सलमानला मारणार असल्याचे सांगितले होते.लॉरेन्सच्या सहकारी गँगस्टरने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकही केली होती, या धमकीनंतर सलमान खान च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
रविवारी सकाळी सलमान खान यांच्या वडिलांना चिठ्ठी मार्फत देण्यात आलेल्या धमकीचा संबंध लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर शी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version