शुक्रवारी पोलिसांनी आरोपी साहिल आणि अल्ताफ यांना अटक केली. दोघांनीही काँग्रेस नगरसेवकाकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. आरोपी साहिलने सांगितले की, हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला २ लाख रुपये देण्यात आले होते. अल्ताफने देखील मान्य केले की त्यालाही फक्त १ लाख रुपये मिळाले होते आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे देण्याचे आश्वासन नगरसेवकाने दिले होते. दोघांच्याही वक्तव्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये लव्ह जिहादी साहिल आणि अल्ताफ त्यांच्या फोनमधील काही हिंदू मुलींचे फोटो देखील दाखवतात. त्यांनी सोशल मीडियावर हिंदू आयडी तयार करून या मुलींना फसवले होते. नंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, त्यांच्याशी लग्न करून त्यांना धर्मांतर करायला लावण्याची योजना आखण्यात आली.
लव जिहाद पर सनसनीखेज खुलासा
– लव जिहाद की फ़ैक्ट्री चलाता है अनवर कादरी
– साहिल शेख़ को दो लाख रुपए दिए
– अल्ताफ़ को एक लाख रुपए दिएऔर कहा- हिंदू लड़कियों से शादी करो और धंधा कराओ
बजरंग दल के सहयोग से इंदौर पुलिस ने अल्ताफ और साहिल को गिरफ्तार किया है pic.twitter.com/pbtbCKu4m2
— Abhay Pratap Singh (बहुत सरल हूं) (@IAbhay_Pratap) June 14, 2025
लव्ह जिहादींनी सांगितले की काँग्रेस नगरसेवकाने त्यांना या मुलींना ‘धंदा’ करायला लावण्यास सांगितले होते. लव्ह जिहादींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली असताना आरोपी नगरसेवक फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी साहिल आणि अल्ताफ यांना सोमवार (१६ जून) पर्यंत रिमांडमध्ये ठेवून त्यांची चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा :
आतंकवादाविरोधात पाठिंबा दिल्याबद्दल आभार
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी लपले बंकरमध्ये!
इराणमध्ये दहा हजारांहून अधिक अडकलेल्या भारतीयांना भूमार्गाद्वारे बाहेर पडण्याची मिळाली परवानगी!
दिल्लीमध्ये ३६ बांग्लादेशी नागरिक पकडले
खरे तर, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोनही आरोपीना रंगेहाथ पकडले होते आणि यानंतर ही माहिती उघड झाली. कार्यकर्त्यांनी दोघांनाही पकडून बाणगंगा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापैकी साहिल एका कार शोरूममध्ये काम करतो आणि अल्ताफ हा रंगकाम करणारा आहे.
बजरंग दलाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्याचबरोबर या कटाला निधी देणारे काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावर पोलिसांनी सांगितले की, दोन पीडित मुलींनी साहिल आणि अल्ताफविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या आधारावर, मौनी बाबा आश्रमामागील सनवेर रोड बाणगंगा येथील रहिवासी २० वर्षीय अल्ताफ खान आणि नरवाल येथील रहिवासी साहिल शेख याच्याविरुद्ध बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
कांग्रेसियों के काले कारनामे
इंदौर में लवजिहाद के लिए फंडिंग करती कांग्रेस pic.twitter.com/DHhGZ8M0rp— कालुराम चौधरी 🌹🇮🇳 🕉️📿🌹 (@KrChoud42412520) June 15, 2025
