लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचे तुर्की कनेक्शन?

आरोपी टेलिग्राम ग्रुपमध्येही होते सामील

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचे तुर्की कनेक्शन?

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात आता तुर्की कनेक्शन उघड झाले आहे. माहितीनुसार, डॉक्टर मॉड्यूलमधील दोन सदस्य डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांच्या पासपोर्टवरून असे दिसून आले आहे की ते टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच तुर्कीला गेले होते. एजन्सींना संशय आहे की ही ट्रिप दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या नेटवर्कशी जोडली गेली असावी. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

संबंधित टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल हे तुर्कीला गेले. तुर्कीहून परतल्यानंतर, दोन्ही डॉक्टरांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात सक्रिय होण्याची योजना आखली. जैशच्या एका हँडलरने त्यांना मॉड्यूलच्या सदस्यांना देशभर पसरवण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित होऊ नये. या निर्देशानंतर, त्यांनी फरिदाबाद, सहारनपूर आणि इतर ठिकाणांची निवड केली.

हे ही वाचा:

पुण्यातील अल-कायदा प्रकरण: मुंब्र्यातील शिक्षक इब्राहिम अबिदीच्या घरी छापेमारी

उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आता दहशतवादी कृत्यात आघाडीवर

फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित डॉक्टरांना कट्टर बनवणाऱ्या इमामला अटक

“पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल” पाक संरक्षण मंत्री असे का म्हणाले?

तपास यंत्रणांना संशय आहे की, दोघांना तुर्कीच्या प्रवासादरम्यान ऑपरेशनशी संबंधित महत्त्वाच्या सूचना मिळाल्या होत्या. तुर्कीमध्ये जाऊन त्यांनी कोणाची भेट घेतली आणि कोणत्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले हे याचा देखील आता तपास करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि केंद्रीय संस्था या लाल किल्ला परिसरातील मोबाईल टॉवर डेटा डंपचे विश्लेषण करत आहेत. या डेटामध्ये पहाटे ३:०० ते ६:३० या कालावधीचा समावेश आहे जेव्हा डॉ. उमर हा त्याच्या आय २० गाडीमधून प्रवास करत होता. मशिदीजवळ काही तास गाडी उभी केली होती. त्यावेळी गाडीतील व्यक्तींनी कोणाशी संपर्क साधला आणि त्या काळात कोणते कॉल, चॅट सक्रिय होते हे शोधणे हा यामागील उद्देश आहे.

Exit mobile version