जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक

आरोपींकडून चिनी पिस्तूल, मॅगझीन, हँड ग्रेनेड आणि रोख रक्कम जप्त

जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक

जम्मू- काश्मीरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांदरबल जिल्ह्यात पोलिसांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) सोबत मिळून गांदरबल पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. गुंडरहमान ब्रिजजवळ नाकाबंदी आणि तपासणीदरम्यान ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख हाजिन (बांदीपोरा येथील रहिवासी) गुलाम नबी मीर (वडील: मोहम्मद सुबहान मीर) आणि शालबुग (गांदरबल येथील रहिवासी) शबनम नजीर (वडील: नजीर अहमद गनी) अशी झाली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एक चिनी पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझीन (Pistol Magazine), चार पिस्तूल राऊंड्स, दोन हँड ग्रेनेड आणि ८,४०,५०० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. ही रोख रक्कम आणि शस्त्रसाठा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गांदरबल पोलिसांनी यूएपीए (UAPA, अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) आणि आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

चीनवर नजर, तेजपूर हवाई तळाचा होणार विस्तार

ख्रिसमसच्या दिवशी पाद्रीने अल्पवयीन मुलीचा केला बलात्कार

आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडू नको, भाजपा खासदाराचाही सवाल

“ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या धाडसी कारवाईचे कौतुक…” मीर यार बलोच यांनी पत्रात काय म्हटले?

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, शस्त्रे व स्फोटके कुठून आणली गेली, रोख रकमेचा वापर कशासाठी होणार होता आणि आरोपींचे कोणत्या दहशतवादी गटाशी संपर्क आहेत, याचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Exit mobile version