विजय मिरवणूक; ठाकरे गटाचे नगरसेवक मिलिंद वैद्यांसह ४० जणांवर गुन्हा

माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला

विजय मिरवणूक; ठाकरे गटाचे नगरसेवक मिलिंद वैद्यांसह ४० जणांवर गुन्हा

माहिममधील वॉर्ड क्रमांक १८२ मधून विजयी झालेले ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यावर अनधिकृत विजय मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्य यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवरही माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिलिंद वैद्य यांनी वॉर्ड १८२ मधून तब्बल १४,२४८ मतांनी विजय मिळवला. मात्र, निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेली विजय मिरवणूक पोलिस परवानगीशिवाय काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. त्यामुळे १८ जानेवारी रोजी तसेच २२ आणि २४ जानेवारी रोजी करण्यात आलेले विजय रॅलीचे अर्ज माहीम पोलिसांनी नाकारले होते. परवानगी नाकारण्यात आली असतानाही २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत माहीम परिसरात विजय मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकरचा वापर तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी माहीम पोलिसांनी मिलिंद वैद्य, विनय आकरे, अविरत शिंदे, संतोष सुर्वे, दीपक सावंत यांच्यासह ४० हून अधिक कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईवर नगरसेवक वैद्य किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, विजय मिरवणुकीचे व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

यूएईचे नाहयान मोदींना भेटले, पाकिस्तानला दणका

कोलकात्याच्या नाजिराबादमधील गोदामाला भीषण आग

रुग्णालयाच्या गेटवर ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडलाच नाही

फिलीपीन्स समुद्रात भीषण दुर्घटना

उल्लेखनीय म्हणजे, या निवडणुकीत मिलिंद वैद्य यांचा सामना भाजपचे राजन पारकर तसेच अपक्ष उमेदवार महेश धनमेहर आणि मिलिंद हरेश्वर वैद्य यांच्याशी झाला होता. याआधी २०१७ च्या बीएमसी निवडणुकीतही वॉर्ड १८२ मध्ये अविभाजित शिवसेना विरुद्ध मनसे अशी चुरशीची लढत झाली होती. त्या वेळी मिलिंद वैद्य यांनी ६ हजारांहून अधिक मते मिळवत विजय मिळवला होता, तर मनसेचे राजन पारकर ५,४७६ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.

Exit mobile version