‘गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी म्हणजेच देश बदलतोय!’

बाबा बागेश्वर यांचे उद्गार

‘गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी म्हणजेच देश बदलतोय!’

देशभरात सध्या गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ आणि ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याच्या मागणीवरून नवीन चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावर आता अनेक मुस्लिम संघटनाही उघडपणे समर्थन देताना दिसत आहेत. मौलाना अर्शद मदनी यांनी गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी केल्यानंतर आग्रा, दिल्ली आणि पुणेसह अनेक शहरांमध्ये मुस्लिम संघटनांनीही या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. दरम्यान, धीरेंद्र कृष्णशास्त्री तथा बाबा बागेश्वर यांनी उत्तराखंडमधील बद्रिनाथ मंदिरात पोहोचून या संपूर्ण घडामोडींचे स्वागत करत “देश खरोखर बदलत आहे,” असे म्हटले.

मौलाना अरशद मदनी यांनी केली होती मागणी

गेल्या आठवड्यात जमियत उलेमा ए हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांनी केंद्र सरकारकडे गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, या पावलामुळे गाईच्या नावाखाली होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना थांबू शकतात आणि समाजातील तणाव कमी होऊ शकतो. त्यांनी असेही म्हटले की, गाय भारतीय समाजात श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक आहे, पण काही लोक तिला राजकीय मुद्दा बनवून समाजात द्वेष पसरवत आहेत. गाईच्या नावाखाली लोकांना भडकवून मुस्लिमांविरोधात वातावरण निर्माण केले जाते आणि त्यातून राजकीय फायदा घेतला जातो.

हे ही वाचा:

नाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट

घरात एसीचा स्फोट होऊन स्पर्धा आयोगाचे पहिले प्रमुख, धनेंद्र कुमार दगावले

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुने १३ दगावले

एआयमुळे बदलतेय नोकरीची पद्धत

बद्रिनाथमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वक्तव्य

दरम्यान, बद्रिनाथ येथे पोहोचलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुस्लिम संघटनांच्या समर्थनावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “आम्ही काल बातम्यांमध्ये पाहिले की देशातील मुसलमानही आता गाईला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन देत आहेत. कदाचित मौलाना मदनी यांनीही भारत सरकारकडे ही मागणी केली आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही गाई पाळणारे आहोत, तर काही लोक गायीचे मांस खातात. आम्ही गायीला भाकरी खाऊ घालतो, पण काही लोक गाईला भाकरीसोबत खातात. आता तेही गाईला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत, म्हणजे देश खरोखर बदलत आहे.”

यापूर्वीही झाली आहे मागणी

गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ किंवा ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याची मागणी यापूर्वीही अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे. गोसंरक्षण आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित संघटनांचे मत आहे की गाय भारतीय परंपरा, शेती आणि श्रद्धेचा महत्त्वाचा भाग राहिली आहे, त्यामुळे तिला विशेष दर्जा मिळायला हवा.

Exit mobile version