“हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका!”

नोटिशीशिवाय मंदिरावर कारवाई करताच आमदार अतुल भातखळकर यांनी दिला इशारा

“हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका!”

मुंबईतील कांदिवलीमधील एका मंदिरावर कोणत्याही नोटीस शिवाय कारवाई केली जात असल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा उचलून धरला असून महापालिकेच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत. तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संबंधित विषय उपस्थित करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले आहे.

कांदिवलीमधील वार्ड क्रमांक २४ मध्ये महादेवाचे पुरातन मंदिर होते. या मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईविषयी बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, महादेवाचे पुरातन मंदिर असून २० वर्षांपूर्वी पुनर्निर्माण करताना या मंदिराची व्याप्ती वाढवण्यात आली होती. करोना काळाचा गैरफायदा घेत हे मंदिर बंद करण्यात आले. पुढे आज सुरू करू, उद्या सुरू करू असे म्हणून दीड वर्ष हे मंदिर बंदच ठेवण्यात आले. महिन्याभरापूर्वी मंदिर हटवण्याचे पाप काही लोकांनी केले. नावासाठी म्हणून छोटे मंदिर बाजूला बनवले. तसेच या संपूर्ण जागेवर एक कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं करण्याचे षडयंत्र काही लोकांनी रचले होते,” असे अतुल भातखळकर म्हणाले.

पुढे आमदार भातखळकर म्हणाले की, “दीड महिन्यापूर्वी मी महानगरपालिकेला पत्र लिहून संबंधित काम थांबवण्याची मागणी केली होती. तसेच हे काम नियमांमध्ये राहून होत आहे का? असा सवाल देखील केला होता. मात्र, महानगरपालिकेच्या प्रशासनाने यावर काहीही कारवाई केली नाही. परवा रविवारी या ठिकाणी पत्रे लागताच आंदोलन करण्याचे नक्की केले. येत्या काही दिवसांमध्ये भव्य मंदिर निर्माण करण्याचे काम होईलच,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचा..

मुंबईसह उपनगरांमध्ये परवडणारी घरे मिळणार! राज्य मंत्रिमंडळात घेतला ‘हा’ निर्णय

आरोपी डॉ. शाहीन, मुझम्मिल यांनी रोख रकमेतून खरेदी केली होती ब्रेझा कार आणि…

दिल्ली स्फोटाप्रकरणी काश्मीर खोऱ्यात छापेमारी

१ कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता माडवी हिडमाचा खात्मा

हिंदू समाजाशी पंगा घेण्याचा आणि हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी विरोध करणाऱ्यांना दिला आहे. मालवणी मध्ये तीन मजली अनधिकृत मशिदी उभ्या राहतात तिथे महापालिकेचे लक्ष नाही, परंतु वार्ड क्रमांक २४ मध्ये नोटीस दिल्याशिवाय मंदिर तोडले जाते ‌हे सहन करणार नाही. दोषी अधिकाऱ्यांवर एफआयआर झाला पाहिजे. ८ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय उपस्थित करणार असल्याचेही अतुल भातखळकर म्हणाले.

Exit mobile version