भारतातील पौराणिक नायक हे हॉलीवूडमधील लोकप्रिय सुपरहिरोपेक्षा कितीतरी पटीने महान आहेत आणि ही माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे सांगत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, मुलांना हे शिकवले पाहिजे की हनुमानाचे सामर्थ्य सुपरमॅनपेक्षाही अधिक आहे, अर्जुन हा आधुनिक काल्पनिक नायकांपेक्षा श्रेष्ठ योद्धा होता, आणि भगवान श्रीराम हे जगातील सर्वोच्च धर्म, नीती आणि न्यायाचे प्रतीक आहेत.
तिरुपती येथील कल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात बोलताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की हनुमान, अर्जुन, श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव ही पात्रे अद्वितीय सामर्थ्य, मूल्ये आणि शहाणपणाचे प्रतीक आहेत.
हे ही वाचा:
‘धुरंधर’चा १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
सोन्याला विक्रमी चमक, पोहोचले १ लाख ३९ हजारांवर
विधानसभा निवडणुका होतील तेव्हा पक्ष पूर्ण बहुमत मिळवेल
गोवंडीत बकरी बांधण्यावरून वाद; सख्ख्या दोन भावाकडून शेजाऱ्याची हत्या
ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले की रामायण आणि महाभारत यांसारखी भारतीय महाकाव्ये केवळ कथा नसून जीवनाचे सखोल धडे देणारी आहेत. या ग्रंथांमधील प्रभावी पात्रे आणि कथांमुळे मुलांना चांगले आणि वाईट यातील फरक समजण्यास मदत होते. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांची आठवण करून देत सांगितले की त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून पौराणिक कथांबद्दल जनतेत पुन्हा रुची निर्माण केली आणि समाजात मूल्यांची जाणीव रुजवली.
योगाबद्दल बोलताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, भारताने संपूर्ण जगाला मानसिक समतोल आणि सार्वत्रिक आरोग्यासाठी योगासारखी अमूल्य देणगी दिली आहे. त्यांनी राज्य सरकारच्या नवीकरणीय ऊर्जेवरील भराचा उल्लेख केला आणि सांगितले की अमरावती येथून लवकरच क्वांटम संगणक कार्यान्वित केला जाईल, तसेच देशातच क्वांटम संगणक विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, भारताने आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक आणि तात्त्विक ज्ञानाचा आधुनिक गरजांसाठी योग्य वापर केला पाहिजे. त्यांच्या मते, खरी प्रगती म्हणजे सांस्कृतिक मुळांचा सन्मान राखत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारतात मोठे परिवर्तन झाले आहे आणि २०३८पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच २०४७ पर्यंत भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चंद्राबाबू नायडू यांनी पालक आणि शिक्षकांना आवाहन केले की मुलांच्या कल्पनाशक्तीला केवळ हॉलीवूड सुपरहिरोपुरते मर्यादित न ठेवता त्यांना भारतीय महाकाव्ये आणि सांस्कृतिक नायकांची ओळख करून द्यावी. त्यांच्या मते, रामायण आणि महाभारतातील पात्रे अधिक सखोल मूल्ये आणि नैतिक स्पष्टता देतात.
