गुरुपौर्णिमा विशेष : भगवा ध्वज रा.स्व. संघाच्या गुरूस्थानी

गुरुपौर्णिमा विशेष : भगवा ध्वज रा.स्व. संघाच्या गुरूस्थानी
भारतीय संस्कृतीमध्ये ‘गुरू’ तत्त्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘गु’ या अक्षराचा अर्थ अंधकार किंवा अज्ञान आणि ‘रु’ म्हणजे अंधार नष्ट करणारा प्रकाश. याप्रमाणे जो शिष्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून त्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरू होय. ही केवळ पुस्तकी ज्ञानाची संकल्पना नाही, तर शिष्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारी, त्याच्यातील सुप्त क्षमतांना जागृत करणारी आणि त्याला अंतिम सत्याची ओळख करून देणारी ही एक चैतन्यमय शक्ती आहे. म्हणूनच संत कबीरांनी म्हटले आहे की समोर गुरू आणि गोविंद (देव) उभे असतील; तर मी प्रथम गुरू चरणी नतमस्तक होईन. कारण त्यांच्यामुळेच मला गोविंदाचे दर्शन घडले.
Exit mobile version