कालीमातेच्या चरणांखाली भगवान शिव : पौराणिक कथा नव्हे, सृष्टी-संतुलनाचा गूढ अर्थ

कालीमातेच्या चरणांखाली भगवान शिव : पौराणिक कथा नव्हे, सृष्टी-संतुलनाचा गूढ अर्थ

कालीमातेच्या पायाखाली भगवान शिव दिसण्याचा प्रसंग हा केवळ पौराणिक आख्यायिकाच नाही, तर त्यामागे एक खोल तत्त्वज्ञान आणि सृष्टी-संतुलनाचा रहस्य दडलेले आहे. हा प्रसंग राक्षस रक्तबीजाच्या वधाशी संबंधित आहे.

असे म्हटले जाते की रक्तबीजाच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबातून एक नवे रक्तबीज जन्म घेत असे. त्याच्या अत्याचारामुळे तिन्ही लोक त्रस्त झाले. देवतांनी देवी दुर्गेला प्रार्थना केल्यावर त्यांनी कृष्णवर्ण, अपार शक्ती आणि विनाशकारी तेजयुक्त महाकालीचा अवतार धारण केला. महाकाली युद्धात उतरली आणि राक्षसांचा संहार सुरू केला. ती रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडण्याआधीच पिऊन टाकत होती, जेणेकरून एकाही थेंबातून नवीन रक्तबीज निर्माण होऊ नये.

राक्षसांचा वध करताना काली मातेचा कोप अत्यंत भयंकर होता. तिचा रौद्र आविष्कार संपूर्ण सृष्टीसाठी धोकादायक होता. मातेला कसे शांत करावे हे देवतांना सुचत नव्हते. सर्व देवतांनी शेवटी भगवान शिवांची मदत मागितली. शिवांना कळून चुकले होते की जर काली अशाच वेगाने पुढे गेली तर सृष्टीचक्रच धोक्यात येईल. म्हणून ते गुपचूप कालीच्या मार्गात जाऊन आडवे झाले.

क्रोधात पुढे जात असलेल्या माते कालींच्या पायाखाली अकस्मात शिवांची छाती आली. आपल्या प्रिय पतीच्या अंगावर पाय पडला हे लक्षात येताच काली मातेचा क्रोध तात्काळ शांत झाला. त्यांच्या चेहऱ्यावर लज्जा, पश्चात्ताप आणि करुणा उमटली. त्याच क्षणी त्यांचा विनाशकारी अवतार निवळला आणि त्या पुन्हा त्यांच्या सौम्य रूपात परतल्या.

हे ही वाचा:

गांधारीचा शाप अजूनही बिहारला भोवतोय?

एक डॉक्टर खुनशी, दहशतवादी कसा असू शकतो? हे आहे त्याचे उत्तर

दिल्ली स्फोटकांचे धागेदोरे मिनी पाकिस्तान बनलेल्या ‘नूंह’मध्ये

फरिदाबादमधून हस्तगत केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना स्फोट, ९ ठार

या दृश्याचा तत्त्वज्ञानात्मक अर्थ अत्यंत गहन आहे. काली म्हणजे ऊर्जा, क्रिया, सक्रियता — म्हणजेच शक्ती, तर शिव म्हणजे स्थैर्य, शांतता आणि परमचेतना — शिवतत्त्व. हिंदू तत्त्वज्ञान सांगते की शक्ती शिवांशिवाय अपूर्ण आणि शिव शक्तीशिवाय निष्क्रिय. ऊर्जा नियंत्रणाबाहेर गेली तर तिला स्थिर चेतनेची आवश्यकता असते. कालींचे शिवावर उभे राहणे म्हणजे शक्तीच्या प्रत्येक कृतीचे मूळ आधार शिव — शुद्ध चेतना — हेच आहे.

हा प्रसंग केवळ धार्मिक नाही, तर जीवनाचे धडे देतो . ऊर्जा आणि शांत बुद्धी यांचा संतुलित मिलाफच सृष्टीचे रक्षण करतो. शक्तीशिवाय शिव काही करू शकत नाहीत, आणि शिवांशिवाय शक्ती विनाशक ठरते. सृष्टीचे संतुलन ह्याच दोघांच्या एकत्वात आहे.

Exit mobile version